• Mon. Jul 27th, 2026
    Raj Thackeray: ‘जेन-झी’ आंदोलनाने सरकारच्या झिंज्या उपटल्या; राज ठाकरे यांची तिखट टीका

    मुंबई : ‘अंधभक्तांच्या विरोधात देशभक्त जिंकले असून हा संघर्ष भाजप विरुद्ध देशभक्त असा आहे,’ असे प्रतिपादन शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी मुंबईतील विजयी मेळाव्यात केले. तर, ‘जेन-झीने सरकारच्या झिंज्याच उपटल्या,’ अशी तिखट टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. या मेळाव्यात तरुणांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

    पेपरफुटीच्या मुद्द्यावर कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शिवसेना उबाठा आणि मनसेने रविवारी शिवाजी पार्क ते सिद्धिविनायक मंदिर असा मोर्चा काढण्याची घोषणा केली होती. मात्र, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शनिवारी राजीनामा दिल्यानंतर, मोर्चाऐवजी शिवाजी पार्क परिसरात तिरंगा विजयी जल्लोष सभा झाली.

    BJP Politics : शिक्षण खात्याची जबाबदारी प्रल्हाद जोशींकडे, मग फडणवीस तातडीनं दिल्लीत का? महायुतीच्या बड्या मंत्र्यानं दिलं उत्तर
    ‘जात, धर्म, पक्ष विसरून आपण देशभक्त भारतीय म्हणून इथे जमला आहात. ही गर्दी विष्णूचा अवतार आहे. नरेंद्र मोदी यांनी आता तरी देशाकडे लक्ष द्यावे. तुमचे मंत्री पक्ष फोडण्यात व्यस्त आहेत; त्यांना देशाचे काम करायला सांगा,’ असे उद्धव म्हणाले. ‘अर्थमंत्री घसरत्या रुपयाबद्दल बोलत नाहीत; पेपरफुटीचे फायदे सांगतात. संरक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या संरक्षणासाठी पुढे आले. खड्डा उर्फ रस्ता मंत्री इथेनॉलवर बोलतात. आत्महत्याग्रस्तांच्या वेदना आम्ही विसरणार नाही,’ असे ते म्हणाले.

    प्रवास फार दूर नाही: आदित्य
    ‘देशातील तरुणांनी हुकूमशाहीला हादरा दिला आहे. ही नव्या भारतातील तरुणाईची ताकद आहे. ‘मंत्री प्रधान’ ते ‘पंतप्रधान’ हा प्रवास आता फार दूर नाही,’ असे आदित्य ठाकरे यांनी सभेनंतर माध्यमांशी बोलताना सांगितले. नितीन गडकरी यांच्या इथेनॉल धोरणाबाबत आणि निर्मला सीतारामन यांच्या निर्णयांबाबत जनतेत नाराजी असून आता ही पिढी प्रत्येक प्रश्नावर सरकारला जाब विचारणार आहे, असेही ते म्हणाले. ‘या तरुणाईने आम्हाला लढायला शिकवले आणि जल्लोष करायलाही शिकवले,’ असे सांगत अमित ठाकरे मंचावर गुडघे टेकून गर्दीसमोर नतमस्तक झाले. ‘आंदोलकांवरील गुन्हे दहा दिवसांत मागे घ्यावेत. अन्यथा महागात पडेल,’ असा इशारा रोहित पवार यांनी दिला.

    Eknath Shinde News | ठाकरे बंधू आणि राहुल गांधींवर एकनाथ शिंदे चांगलेच संतापले

    राज ठाकरेंकडून आत्महत्याग्रस्तांचे स्मरण
    नीट पेपरफुटीनंतर देशभरात २१ विद्याथ्यांनी आत्महत्या केल्याचा उल्लेख करत राज ठाकरे यांनी त्यांची नावे वाचून दाखवली आणि एक मिनिट मौन पाळून आदरांजली वाहिली. ‘तुम्ही पेटवलेल्या आंदोलनाला यश आले, देशातील जेन-झी सरकारच्या झिंज्या कशा उपटते, हे या आंदोलनातून दिसले,’ असे राज ठाकरे म्हणाले. ‘मुंबई पोलिसांनी उत्तम सहकार्य केले. हाच महाराष्ट्र आणि दिल्लीच्या पोलिसांमधील फरक आहे,’ असे म्हणत राज यांनी मुंबई पोलिसांचे आभार मानले. त्यावर उपस्थितांनी टाळ्या वाजवून दाद दिली.

    ठिणगी पेटती ठेवणे आपले काम
    ‘या आंदोलनाने ठिणगी पडली असून देशात वणवा पेटला आहे. या आंदोलनामुळे मोदींनी पाहिले की, मते चोरता येतात, लोक चोरता येत नाहीत, मने चोरता येत नाहीत. ही ठिणगी पेटती ठेवणे आपले काम आहे,’ असे उद्धव ठाकरे म्हणाले.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed