• Fri. Mar 6th, 2026

    Baramati Crime: बारामतीत प्रेमीयुगुलाला कोयत्याने मारहाण; सोन्या-चांदीचे दागिनेही लुटले, तीन विकृत तरुणांना अखेर अटक!

    Baramati Crime: बारामतीत प्रेमीयुगुलाला कोयत्याने मारहाण; सोन्या-चांदीचे दागिनेही लुटले, तीन विकृत तरुणांना अखेर अटक!

    दीपक पडकर, बारामती: बारामतीतील तांदुळवाडी येथे एलसी कंपनी लेक परिसरात तरुणावर कोयत्याने वार करून सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम लुटल्याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून ३ लाख २४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, २६ फेब्रुवारी रोजी रात्री सुमारे ८.४० वाजण्याच्या सुमारास बारामतीतील तांदुळवाडी विमानतळ रोडलगत असलेल्या एलसी कंपनी लेक येथील मोकळ्या जागेत फिर्यादी संतोष रायनवार (बदलेलं नाव) (मूळ राहणार, नागपूर वय २६, हल्ली बारामती) हे त्यांच्या मैत्रिणीसोबत बसले होते. त्यावेळी तोंडाला मास्क व रुमाल बांधलेल्या तिघा इसमांनी त्यांच्या जवळ येत लोखंडी सत्तूर, कोयत्याचा धाक दाखवून पैशांची मागणी केली. विरोध केल्यावर एका आरोपीने फिर्यादीच्या डाव्या पायावर वार करून जखमी केले. त्यानंतर आरोपींनी सोन्याची सुमारे २१ ग्रॅम वजनाची चैन (किंमत ३ लाख रुपये), चांदीची अंगठी (५ हजार रुपये), चांदीची चैन (१५ हजार रुपये), आणखी एक चांदीची अंगठी (२ हजार रुपये) व २ हजार रुपये रोख असा एकूण ३ लाख २४ हजार रुपयांचा मुद्देमाल जबरदस्तीने काढून घेतला व ‘परत इकडे यायचं नाही’ अशी धमकी देत तेथून पसार झाले.

    याप्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यात येथे बी.एन.एस कलम ३०९(६),३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून तपासा दरम्यान प्रसाद गणपत भोसले वय २४, धैर्यशील प्रशांत आगवणे, वय १९ व कृष्णा नाना गाडेकर वय २१ (सर्व रा. तांदुळवाडी, ता.बारामती) यांना २८ फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली. न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

    दरम्यान, ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस उपनिरीक्षक युवराज पाटील, पोलीस अंमलदार सुरेंद्र वाघ, भारत खारतोडे, मनोज पवार, जितेंद्र शिंदे, राजू बन्ने व पथकाने केली.

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे | २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधण्याचेही काम करत आहे. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी लोकमत, न्यूज १८ लोकमत आणि एबीपी माझा या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून मुंबईतील रूईया महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *