अजित पवारांच्या विमान अपघातावर छगन भुजबळ यांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न. व्हायरल व्हिडिओचा दाखला देत विमान मालकावर कारवाईची मागणीही भुजबळांनी केली आहे.
‘प्रत्यक्षदर्शी, कुणीही सांगितलं नाही..’
भुजबळ म्हणाले की, “मी स्वतः तिथे होतो, पण विमान झाडाला आदळल्याचं मला कुणीही सांगितलं नाही. जर विमान झाडाला धडकलं असतं, तर त्या झाडाचंही काहीतरी नुकसान झालं असतं. तिथे उपस्थित असलेल्या हजारो लोकांपैकी एकही प्रत्यक्षदर्शी असं म्हणत नाही की विमान झाडावर आदळलं. त्यामुळे ही माहिती देणाऱ्यांचीही चौकशी व्हायला हवी.”
लँडिंगच्या शेवटच्या क्षणाला काय घडलं?
भुजबळ यांनी सीसीटीव्ही फुटेजचा हवाला देत सांगितलं की, “विमानाने पहिल्यांदा लँडिंगचा प्रयत्न केला, पण तो रद्द करून पायलट पुन्हा दुसऱ्या राऊंडसाठी गेला. दुसऱ्या वेळी लँडिंग करताना विमान पूर्णपणे एका बाजूला कललं होतं. लँडिंगच्या वेळी वेग जास्त असतो, कदाचित उंची कमी असल्याने वैमानिकाला विमान सावरण्यासाठी वेळच मिळाला नसावा,” या प्रकरणाची सखोल छानबीन डीजीसीए ( DGCA ) कडून होईलच, असेही त्यांनी स्पष्ट केले.
Pm Narendra Modi: पीएम मोदींच्या YouTube चॅनेलला 30 मिलियन सबस्क्राइबर्स, जागतिक पातळीवर डिजिटल कनेक्टचा विक्रम
पायलट सीटवरील व्हिडिओवर संताप
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओवर बोलताना भुजबळ यांनी कडक शब्दांत ताशेरे ओढले. “विजय पवार यांनी शेअर केलेला व्हिडिओ त्या अपघातग्रस्त विमानाचा नाही, कारण त्यातील व्यक्ती तर जिवंत आहे. तो दुसऱ्या विमानाचा असावा. पण कुठल्याही विमानात पायलटच्या सीटवर मालकाने बसणे आणि तिथे झोपणे हा शुद्ध माजोरीपणा आणि निष्काळजीपणा आहे.
MSRTC Revenue : लालपरीच्या महसुलाला नवा ‘बूस्टर’, एसटी मालामाल होणार; 5 वर्षांत 250 कोटी कमावण्याचे लक्ष्य
अशा मालकावर कठोर कारवाई झालीच पाहिजे,” अशी आक्रमक भूमिका भुजबळ यांनी व्यक्त केली आहे.
