• Sun. Sep 20th, 2026

Mumbai News: मुंबईत उंच झोपड्यांवर हातोडा; चौदा फुटांवरील 34 हजार बांधकामांवर होणार कारवाई, BMCचा मोठा निर्णय

Mumbai News: महापालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडे यांच्या निर्देशांनुसार अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांच्या मार्गदर्शनात या बांधकामांविरोधात कारवाई सुरू आहे.

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
मुंबई : मुंबईत गेल्या काही वर्षांत अनधिकृत झोपड्यांचे इमले वाढले असून, दुमजली, तीन मजली आणि त्याहून अधिक मजली झोपड्यांचे पेव फुटले आहे. या बेकायदा बांधकामांविरोधात मुंबई महापालिकेने आता कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. १४ फुटांपेक्षा अधिक उंचीच्या झोपड्यांवर कारवाई करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला असून, एकूण ३४ हजार ५२७ अनधिकृत झोपड्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे.

मुंबई महापालिका १ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर २०२६पर्यंत झोपडपट्टी परिसरातील अनधिकृत बांधकामाविरोधात विशेष मोहीम राबवणार आहे. झोपडपट्टी क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांमध्ये वास्तव्यास असलेल्या नागरिकांनी ही बांधकामे स्वत:हून पाडावीत, अन्यथा कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा महापालिकेने दिला आहे.

Maharashtra TimesMumbai Kalachowki : बाप्पाच्या दर्शनाला गर्दी, मुंबईतील काळाचौकीच्या गणपती मंडपासमोर आक्रित घडलं; विजेचा धक्का लागल्यानं चिमुकलीचा करुण अंतमुंबई शहर आणि उपनगरांमध्ये एकूण २ लाख २३ हजार १५० झोपड्या आहेत. त्यापैकी ३९ हजार १११ झोपड्या १४ फूट आणि त्यापेक्षा अधिक उंचीच्या असल्याचे निर्दशनास आले आहे. यापैकी ३ हजार ३४८ झोपड्या शहर विभाग, ४ हजार ५३६ झोपड्या पश्चिम उपनगरे आणि ३१ हजार २२७ झोपड्या पूर्व उपनगरांत आहेत.

मुंबईतील अनधिकृत बांधकामांविरोधात महापालिकेच्या विविध वॉर्डकडून सातत्याने कारवाई सुरू आहे. २४ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत एकूण १२८ अनधिकृत बांधकामांवर पाडकामाची कारवाई करण्यात आली. १४० अनधिकृत बांधकामांविरोधात कारवाई नियोजित आहे. नागरिकांनी अनधिकृत बांधकामे करू नयेत, अशा प्रकारची बांधकामे केल्यास ती स्वतःहून तत्काळ हटवावीत, अन्यथा त्यांच्यावर कारवाईचा इशारा मुंबई महापालिकेने दिला आहे.

Maharashtra TimesPankaja Munde: तिकडे कोणी काजू, बदाम खाण्यासाठी गेले नव्हते; पंकजा मुंडेंनी विरोधकांना फटकारलंयाआधीही पाडकाम, नोटिसा
याआधी ४,५८४ झोपड्यांवर पाडकामाची करवाई करण्यात आली आहे, तर ६११ झोपड्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. उर्वरित झोपड्यांमध्ये वास्तव्यास असलेल्या रहिवाशांनी संबंधित बांधकामे स्वतःहून तत्काळ पाडावीत, अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

२,२३,१५०- मुंबई शहर आणि उपनगरांतील एकूण झोपड्या

३९,१११- चौदा फुटांपेक्षा उंचीच्या झोपड्यांची संख्या

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा