• Fri. Mar 6th, 2026
    Satara News: अजिंक्यतारा किल्ल्यावर काळजाचा ठोका चुकवणारी घटना, संवर्धनाचे काम करणाऱ्या कामगाराचा 200 फूट खोल दरीत पडून मृत्यू

    साताऱ्यातील ऐतिहासिक अजिंक्यतारा किल्ल्यावर गड संवर्धनाचे काम सुरू असताना एक धक्कादायक घटना घडली आहे. पुणे जिल्ह्यातील ५८ वर्षीय कामगाराचा २०० फूट खोल दरीत पडून मृत्यू झाला. शिवेंद्रसिंहराजे रेस्क्यू टीमने शर्थीचे प्रयत्न करून मृतदेह बाहेर काढला.

    अजिंक्यतारा किल्ल्याच्या दरीत पडून कामगाराचा मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    सुधीर पाटील, सातारा: ऐतिहासिक अजिंक्यतारा किल्ल्याच्या कड्यावरून २०० फूट खोल दरीत पडून कामगाराचा मृत्यू झाला आहे. गड संवर्धनांतर्गंत किल्ल्यावर काम सुरू आहे. त्याठिकाणी तो कामगार होता. रविवारी रात्री तो दरीत पडला होता. आज सकाळी ही घटना निदर्शनास आल्यानंतर शिवेंद्रसिंहराजे ट्रेकर्स ॲंड रेस्क्यू टीमने शर्थीचे प्रयत्न करून मृतदेह दरीतून वर काढला. नामदेव रमाजी गबाले (वय ५८, रा. मंचर, पुणे), असे मृताचे नाव आहे.

    सरकारने गड संवर्धन मोहीम हाती घेतली आहे. त्या अंतर्गत अनेक गड-किल्ल्यांवर संवर्धनाची कामे सुरू आहेत. अजिंक्यतारा किल्ल्यावर पुणे जिल्ह्यातील दहा-पंधरा कामगार काम करत आहेत. त्यातील नामदेव गबाले हा कामगार रविवारी रात्री कड्यावरून २०० फूट खोल दरीत पडला होता. सोमवारी सकाळी ही घटना निदर्शनास आली. त्यानंतर रेस्क्यू ऑपरेशन राबवून मृतदेह दरीतून वर काढण्यात आला.

    दरीत ज्या ठिकाणी कामगार पडला होता. त्या ठिकाणी मोठमोठे दगड होते. त्यामुळे तो गंभीर जखमी झाला होता. या घटनेची कोणालाच कल्पना नव्हती. त्यामुळे तो रात्रभर दरीतच होता. वेळेवर उपचार न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाला. आज सकाळी दरीतून मृतदेह बाहेर काढून जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आला. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात झाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

    Maharashtra TimesMumbai Crime : दादागिरीच्या वादातून 14 वर्षांच्या मित्राला संपवलं, विहार तलावात फेकलं; तीन अल्पवयीनांची कबुली, पोलिस तपासात बनावाचा पर्दाफाश

    इटकरेत भीषण आग; साडेसात लाखांची रोकड व दागिने जळून खाक

    सांगली: सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातल्या इटकरे येथे माने बंधूंच्या राहत्या घराला दुपारी अचानक भीषण आग लागली. काही क्षणांत आगीने रौद्ररूप धारण करत दोन्ही भावांचे घर जळून खाक झाले. घरबांधणीसाठी ठेवलेली सुमारे साडेसात लाखांची रोकड तसेच सोन्या-चांदीचे दागिने आगीत नष्ट झाले. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आसांगलीच्या शिराळा तालुक्यातल्या इटकरे येथे राहत्या घराला भीषण आग लागली आहे. ज्यामध्ये सुमारे नऊ लाखांचं नुकसान झालं आहे. इटकरे येथील माने बंधूंच्या घराला ही आग लागली आहे. ज्यामध्ये दोन्ही भावांचे घर जळून खाक झाली आहेत, या आगीमध्ये साडेसात लाखांच्या रोकड आणि सोन्या चांदीचे दागिनेही जळाले आहेत.

    Maharashtra TimesLunar Eclipse 2026: होळीच्या रंगातच वर्षातील पहिलं खग्रास चंद्रग्रहण, खगोलप्रेमींसाठी खास पर्वणी, श्रद्धा-शास्त्राचा संगम अनुभवण्याची संधी

    घराच्या बांधकामासाठी दोघा भावांनी ही रक्कम घरात ठेवली होती.दुपारच्या सुमारास माने यांच्या घरातुन अचानकपणे धुराचे लोळ उठले, काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केलं, ज्यामध्ये घरातील संसार साहित्यासह इतर साहित्य रोख रक्कम आणि सोने चांदीचे दागिने जळून खाक झाले आहेत, शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे,मात्र आगीचं कारण हे समजू शकलो नाही,पण या घटनेमुळे इटकरे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे, हे एक पत्रकार आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून बी.ए व एम.ए. पत्रकारितेचं पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉलेज जीवनातच ‘दैनिक दिव्य मराठी’मध्ये पत्रकारितेचं प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलं आहे. दोन वर्षे ‘लोकसत्ता डॉट कॉम’साठी ‘फोटोगॅलरी व वेबस्टोरी’ या विभागात काम केलं आहे. ते ६ ऑक्टोबर २०२५ पासून ‘महाराष्ट्र टाईम्स’ ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयांच्या लिखाणात आवड आहे. याशिवाय काव्य लेखन, गीत लेखन आणि सादरीकरणातही स्वारस्य आहे. फोटोग्राफी, फोटो, व्हिडिओ संपादनातही खास रस आहे… आणखी वाचा