• Sat. Jun 6th, 2026

    Pune Metro: कोंढवा ते येवलेवाडी मार्गावर धावणार मेट्रो, 20 किमी लांब मार्गिकेचा प्रस्ताव; दक्षिण पुणेकरांचा प्रवास सुखकर

    Pune Metro: कोंढवा ते येवलेवाडी मार्गावर धावणार मेट्रो, 20 किमी लांब मार्गिकेचा प्रस्ताव; दक्षिण पुणेकरांचा प्रवास सुखकर

    Kondhwa – Yewalewadi Metro: दक्षिण पुण्यातील कोंढवा ते येवलेवाडी मार्गावर मेट्रो प्रस्तावित आहे. ही 20 किमी लांब मार्गेका हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोच्या विस्तारिकरणचा भाग असेल.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    पुणे: दक्षिण पुण्यातील कोंढवा आणि येवलेवाडी परिसरातील रहिवाशांना लवकरच मेट्रो मिळणार असल्यची शक्यता आहे. शिवाजीनगरपासून ते येवलेवाडीपर्यंत मेट्रोचा विस्तार करण्याच्या सध्या प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. सर्व मंजुऱ्या आणि सर्वेक्षण वेळेत पूर्ण झालं तर 2030-31पर्यंत ही मेट्रो मार्गिका सुरू करण्याचं उद्दिष्ट आहे. महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी शिवाजीनगर ते येवलेवाडी अशी 20 किमी लांब उन्नत मार्गिका उभारण्याचं काम हाती घेतले असल्याची माहिती दिली.

    कुठून-कसा असेल मार्ग?

    हिंजवडी ते शिवजीनगर 23 किमी लांब मार्गिकेच्या विस्तारीकरणाचा हा एक भाग आहे. हिंजवडी – शिवाजीनगर मेट्रो सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्वावर उभारली जात आहे. परंतु, कोंढवा ते येवलेनगर मेट्रोचं काम थेट महामेट्रोकडून करण्यात येणार आहे. या मार्गावर एक अतिरिक्त स्परद्वारे एनबीएम ते उंड्री विस्तारही होणार आहे. हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोला कॅम्प आणि पुलगेट मार्गे जोडण्याचा प्रस्ताव आहे.Maharashtra TimesMumbai Airport Flights Cancelled: इराण-इस्रायल संघर्षाचा हवाई वाहतुकीवर परिणाम, मुंबई विमानतळासह देशभरातील 444 उड्डाणे रद्द

    महामेट्रोचे संचालक अतुल गाडगीळ यांनी टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या माहितीनुसार, सध्या प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी सल्लागारांची नियुक्ती करण्यात आली आहे. क्षेत्र सर्वेक्षणाचाही सध्या अभ्यास सुरू आहे. प्रस्तावित मार्ग शिवाजीनगर पासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जोडून नंतर कॅम्प आणि पुलगेट मार्गे कोंढावा आणि येवलेवाडीकडे वाढवण्यात येणार आहे. तसेच प्रस्तावित स्पर लाइन ज्योती चौक ते एनआयबीएम जंक्शन आणि पुढे बिशप विद्यालयाजवळ उंड्रीपर्यंत नियोजित केला आहे. शिवाय या मार्गावर 1 किमी अंतरावर मेट्रो स्थानक उभारण्याचं सध्या नियोजन आहे.

    Maharashtra TimesPanvel-Karjat Railway: पावसाळ्यानंतर पनवेल-कर्जत रेल्वेसेवा सुरू, मध्य रेल्वेवर पाचवा मार्ग; 5 स्थानकांचा समावेश

    कधी काम सुरू होणार?

    या मार्गिकेसाठी सुमारे दोन महिन्यांपूर्वी सल्लागारांची नियुक्ती केली गेली होती. मे-जूनपर्यंत सविस्तर प्रकल्प अहवाल सादर होणे अपेक्षित असून सर्वेक्षण करून तो पुढील वर्षापर्यंत राज्याच्या मान्यते नंतर केंद्राकडे पाठवण्यात येणार आहे. पावसाळी अधिवेशनात आमदार योगेश टिळेकर यांनी कोंढला-येवलेवाडी मेट्रो मार्गाची मागणी केली होती. हडपसरपर्यंत मेट्रो मंजूर झाली असली तरी कोंढवा परिसरात मेट्रो नसल्याने नागरिकांना प्रवासात त्रास सहन करावा लागत आहे.

    गेल्या वर्षी राज्य सरकारने पुण्यातील पूर्व आणि पश्चिम भागांमधील कनेकटीव्हीटी मजबूत करण्यासाठी एका नव्या मेट्रो मार्गिकेला मंजुरी दिली होती. खडकवासला, हडपसर, स्वारगेट आणि खराडी असा हा मार्ग ठरवण्यात आला आहे.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम, मटा ऑनलाईनमध्ये कन्सल्टंट पदावर कार्यरत आहे. प्रामुख्याने क्राइम, सिव्हिक आणि पॉलिटिक्स या बातम्या कव्हर करते. याआधी सहा महिने महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमध्ये कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून काम केले आहे. त्या काळात कॉलेज इव्हेंट्स, शैक्षणिक उपक्रम आणि सोशल मीडियावरील ट्रेंड्सवर बातम्या केल्या. मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून BMM मध्ये पदवी घेतल्यानंतर सध्या के.सी. महाविद्यालयात MA in Communication and Journalism करत आहे. इंटरनॅशनल घडामोडी आणि पॉप कल्चर हे विषय विशेष आवडीचे असून इंग्लिश आणि मराठी या दोन्ही भाषेत वाचन व लेखन करण्याची आवड आहे.… आणखी वाचा