Mumbai-Konkan Trains: होळीनिमित्त मुंबईहून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी 8 विशेष रेल्वे गाड्यांची घोषणा केली गेली आहे. संपूर्ण वेळापत्रक आणि थांब्यांची सविस्तर यादी पाहा
विशेष गाड्यांचं वेळापत्रक
(०१०४९/५०) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-मडगाव विशेष गाडी (०१०४९) सीएसएमटीहून मध्यरात्रीनंतर १२.३० वाजता रवाना होईल आणि त्याच दिवशी दुपारी १.३० वाजता मडगावमध्ये पोहोचेल. परतीचा प्रवास (०१०५०) मडगावहून दुपारी ४.३० वाजता सुटेल आणि सीएसएमटीमध्ये दुसऱ्या दिवशी पहाटे ५.२० ला पोहोचेल. ३ आणि ६ मार्चला दोन्ही गाड्या धावणार आहेत.
Pune Metro: कोंढवा ते येवलेवाडी मार्गावर धावणार मेट्रो, 20 किमी लांब मार्गिकेचा प्रस्ताव; दक्षिण पुणेकरांचा प्रवास सुखकर
(०१०४७/४८) लोकमान्य टिळक टर्मिनस-मडगाव विशेष गाडी (०१०४७) एलटीटीहून रात्री १०.१५ ला सुटेल आणि मडगावमध्ये दुसऱ्या दिवशी दुपारी १२ वाजता पोहोचेल. २८ फेब्रुवारी आणि ७ मार्चला ही गाडी धावणार आहे. परतीचा प्रवास (०१०४८) मडगाव येथून सायंकाळी ६ ला सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ६.०५ ला एलटीटीत पूर्ण होईल. १ आणि ८ मार्चला ही गाडी धावेल.
कुठे असतील थांबे?
विशेष गाड्या दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवी आणि करमळी स्थानकांवर थांबतील. विशेष गाड्यांच्या सविस्तर माहितीसाठी मध्य आणि कोकण रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.
Panvel-Karjat Railway: पावसाळ्यानंतर पनवेल-कर्जत रेल्वेसेवा सुरू, मध्य रेल्वेवर पाचवा मार्ग; 5 स्थानकांचा समावेश
वाहतूक मार्गांत बदल
वाहतूककोंडी टाळण्यासाठी २८ फेब्रुवारी व १ मार्च रोजी सकाळी ६ ते रात्री ११ वाजेपर्यंत नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात जड व अवजड वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. काही मार्गांवर वाहतूक प्रतिबंधित करून पर्यायी मार्गांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी व्यापक नियोजन करण्यात आले असून, १ डीसीपी, १ एसीपी, २० अधिकारी, ५०० अंमलदार व ५०० वार्डन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. क्रेन व टोइंग व्हेईकलचीही तयारी ठेवण्यात आली असल्याची माहिती नवी मुंबई वाहतूक शाखेचे उपायुक्त तिरुपती काकडे यांनी दिली.
