Pune Woman Uterus Removed : अवघ्या दहा दिवसांतच पुन्हा त्रास होऊ लागला. त्यामुळे तपासणीसाठी रुग्णालयात गेल्या असता त्यांचे गर्भाशय काढून टाकण्यात आल्याचे उघडकीस आले.
काय घडलं नेमकं?
या प्रकरणी मुंढवा रस्त्यावरील साई केअर रुग्णालयातील डॉ. संदीप कराड, डॉ. मंदार साहुजी, डॉ. निहाल शेख, डॉ. शेहजाद शेख आणि सूरज कांबळे यांच्याविरोधात रुग्णाचे जीवित धोक्यात आणल्याप्रकरणी कलम १२५ (ब) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत, केशवनगर येथील ३५ वर्षीय महिलेने मांजरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही घटना १५ सप्टेंबर २०२५ रोजी घडली. त्यानंतर तक्रारदारांना पुन्हा त्रास झाल्याने तपासणी केली असता, हा प्रकार उघड झाला.
गर्भाशयात छोटी गाठ
तक्रारदार महिला ‘ब्यूटी पार्लर’ चालवतात. त्यांनी २०२३ मध्ये सोनोग्राफी केली असता, गर्भाशयात छोटी गाठ असल्याचे दिसले. डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्या उपचार घेत होत्या. मात्र, त्रास वाढल्यानंतर त्यांना मागील वर्षी १३ सप्टेंबर रोजी मांजरी बुद्रुक येथील साई केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले. सोनोग्राफीच्या अहवालाच्या आधारे डॉक्टरांनी लेझर शस्त्रक्रियेद्वारे गर्भाशयातील गाठ काढावी लागेल, असे सांगितले. त्यामुळे तक्रारदार दुसऱ्याच दिवशी रुग्णालयात दाखल झाल्या. त्यानंतर १५ सप्टेंबरला त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. दोन दिवसांनंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.
Rajyasabha Election : राज्यसभेच्या सातही जागांवर उमेदवार उतरवा, अमित शाहांच्या थेट सूचना, अतिरिक्त 20 मतांसाठी महायुतीची जुळवाजुळव
डॉक्टरांची उडवाउडवीची उत्तरं
मात्र, अवघ्या दहा दिवसांतच त्यांना पुन्हा त्रास होऊ लागला. त्यामुळे त्या तपासणीसाठी रुग्णालयात गेल्या. त्या वेळी त्यांचे गर्भाशय काढून टाकण्यात आल्याचे उघडकीस आले. ‘डिस्चार्ज समरी’त त्याचा उल्लेख नव्हता. त्यामुळे त्यांनी डॉक्टरांना विचारणा केली. गर्भाशयातील गाठी काढण्यास परवानगी दिली होती; गर्भाशय काढण्यास संमती दिली नव्हती, अशी विचारणा तक्रारदारांनी केली. मात्र, डॉक्टरांनी समाधानकारक उत्तर दिले नाही, असे तक्रारीत नमूद आहे.
Ajit Pawar : अजितदादांचं विमान जमिनीवर आदळताच पायलटचे शेवटचे शब्द काय? AAIB च्या 22 पानी अहवालात माहिती समोर
पोलिसांनी या तक्रारीची गंभीर दखल घेऊन रुग्णालयाकडून वैद्यकीय कागदपत्रे, संमतीपत्र आणि शस्त्रक्रियेचा अहवाल मागविला; तसेच तज्ज्ञ डॉक्टरांची चौकशी समिती नेमली. समितीने या प्रकरणात वैद्यकीय निष्काळजीपणा झाल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी चार डॉक्टरांसह एकावर गुन्हा दाखल केला.
महाराजांच्या शौर्याची कथा, अमोल कोल्हे भरभरून बोलले, भाषण ऐकून सारेच भारावले
