• Wed. Mar 11th, 2026

    MH LIVE NEWS

    Mh Live News of Officeal News Website

    मंगेश्री बाहेर येईल ना? नागपुरात दारुगोळा निर्मिती कंपनीत एकामागून एक स्फोट, धुराच्या लोटांखाली एका आईची कासावीस प्रतीक्षा

    Nagpur Explosives Manufacturing Company Blast : ‘जवळपास एक ते दीड तास एकामागून एक स्फोट होत होते. आम्ही आजवर असा भीषण प्रकार कधीच पाहिला नाही, असं शेजारच्या युनिटमध्ये कार्यरत कांता चचाने यांनी सांगितले.

    कांता चाचने(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    नागपूर : रोजची तीच सकाळ, तेच कामाचे तास आणि तोच उत्साह. कळमेश्वर तालुक्यातील राहुळगाव येथील ‘एसबीएल एनर्जी लिमिटेड’मध्ये रविवारी सकाळची शिफ्ट नेहमीप्रमाणे सुरू झाली होती. पण सकाळी ७ ते ७.३० च्या सुमारास एकाएकी काळाकुट्ट धूर आकाशात झेपावला आणि पाठोपाठ सुरू झाला मृत्यूचा तांडव करणाऱ्या स्फोटांचा थरार…

    नागपूरच्या काटोल तालुक्यातील मौजा येनबिहीर येथे एस.बी.एल. एनर्जी लि. या दारुगोळा निर्मिती करणाऱ्या कंपनीत रविवार एक मार्च रोजी सकाळी सुमारे ७.४५ वाजता भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेत तब्बल १७ जणांचा मृत्यू झाला असून २४ जण गंभीर जखमी झाले आहेत.

    एका मागोमाग एक स्फोट

    प्लांटमध्ये कार्यरत असलेल्या कांता चचाने यांच्यासाठी हा दिवस एखाद्या भयानक स्वप्नासारखा होता. त्या स्वतः तिथे काम करत होत्या. अचानक डेटोनेटर पॅकिंग युनिटमधून मोठ्या आकाराचा दगड आपटल्यासारखे प्रचंड आवाज येऊ लागले. पाहता पाहता आवाजाची तीव्रता इतकी वाढली की, संपूर्ण परिसर हादरला. ‘जवळपास एक ते दीड तास एका मागोमाग एक स्फोट होत होते. आम्ही आजवर असा भीषण प्रकार कधीच पाहिला नव्हता,’ असे शेजारच्या युनिटमध्ये कार्यरत कांता चचाने यांनी सांगितले.
    Maharashtra TimesAjit Pawar : अजितदादांचं विमान जमिनीवर आदळताच पायलटचे शेवटचे शब्द काय? AAIB च्या 22 पानी अहवालात माहिती समोर

    त्या एका भेटीसाठी आसुसलेले डोळे

    सुरक्षेच्या कारणास्तव सर्व कामगारांना तातडीने बाहेर काढण्यात आले. जीव वाचवण्यासाठी प्रत्येकजण गेटच्या दिशेने धावत होता, पण कांताबाईंचे पाय मात्र तिथेच थबकले होते. ज्या ‘डेटोनेटर पॅकिंग युनिट’मध्ये स्फोटांची मालिका सुरू होती, त्याच युनिटमध्ये त्यांची २६ वर्षांची मुलगी मंगेश्री रवींद्र येसकर काम करत होती. स्फोट थांबल्यानंतर जखमींना बाहेर काढण्याचे काम सुरू झाले. रुग्णवाहिकांचे सायरन आणि लोकांचा आरडाओरडा यात कांताबाईंचे डोळे फक्त एकाच चेहऱ्याला शोधत होते. बाहेर येणाऱ्या प्रत्येक जखमीमध्ये त्या आपल्या लेकीला शोधत होत्या.

    माझी मुलगी कुठे आहे?

    अंगावर काटा आणणाऱ्या त्या स्फोटांच्या आवाजापेक्षाही, एका आईच्या काळजाचा ठोका चुकवणारी ती शांतता अधिक भयानक होती. घटनेला काही तास उलटले तरी, प्लांटच्या बाहेरून नजर न हटवणाऱ्या कांताबाईंची प्रतीक्षा संपण्याचे नाव घेत नव्हती. प्रशासकीय यंत्रणा आणि मदतकार्य वेगाने सुरू असले, तरी ‘माझी मुलगी कुठे आहे?’ या एका प्रश्नाचे उत्तर कुणाकडेही नव्हते.
    Maharashtra TimesPune Crime : पोटातील गाठीऐवजी 35 वर्षीय महिलेचं गर्भाशयच काढलं, पुण्यातील खासगी हॉस्पिटलच्या चार डॉक्टरांवर गुन्हा
    एकीकडे स्फोटांच्या धुराने आसमंत काळवंडला होता, तर दुसरीकडे आपल्या पोटच्या गोळ्यासाठी व्याकुळ झालेली एक आई भविष्यातील काळोखाच्या भीतीने सुन्न झाली होती. राहुळगावच्या या घटनेने केवळ नागपूर जिल्हाच हादरला नाही, तर औद्योगिक सुरक्षेच्या प्रश्नासोबतच अनेक कुटुंबांच्या उद्ध्वस्त झालेल्या स्वप्नांची दाहकता समोर आणली आहे.

    Nagpur | नेदरलँडचा महापौर आईच्या शोधात नागपूरला,प्रशासन लागलं कामाला, भेट घालून देण्याचं आश्वासन

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश सतीश बेंद्रे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक पदावर कार्यरत आहेत. गेल्या तीन वर्षांपासून ते मटासोबत काम करत आहेत. राजकीय, गुन्हेगारी आणि मनोरंजन या विषयातील बातम्यांमध्ये त्यांचा विशेष हातखंडा आहे. ब्रेकिंग न्यूजसोबतच निवडणूक विषयक विश्लेषण करण्यात त्यांना अधिक रस आहे. त्यांनी झेविअर्स कॉलेजमधून मास कम्युनिकेशनचे पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. आतापर्यंत एबीपी माझा, टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 12 वर्षांहून अधिक काळचा अनुभव त्यांना आहे… आणखी वाचा