• Mon. Sep 21st, 2026

Sunetra Pawar : माळेगाव कारखान्यासाठीचं दादांचं स्वप्न पूर्ण करण्याचा सुनेत्रा पवारांचा निर्धार

Sunetra Pawar : माळेगाव कारखान्यासाठीचं दादांचं स्वप्न पूर्ण करण्याचा सुनेत्रा पवारांचा निर्धार

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अजित पवारांप्रमाणेच बारामतीत सकाळीच कामाला सुरुवात केली.माळेगाव सहकारी साखर कारखान्यात सुनेत्रा पवारांनी सविस्तर आढावा बैठक घेतली. अजित पवारांप्रमाणेच सुनेत्रा पवारांनी भेटीसाठी आलेल्यांची निवेदनं स्वीकारून प्रश्न समजून घेतले.कारखान्याच्या कार्यप्रणाली, ऊस गाळप हंगामाची तयारी, आर्थिक स्थिती व भविष्यातील विकास आराखड्याबाबत चर्चा करण्यात आली.अजितद पवार यांचे स्वप्न होते की माळेगाव सहकारी साखर कारखाना देशात क्रमांक एक बनावा असं सुनेत्रा पवार म्हणाल्या.आपण सर्व मिळून अजितदादांचे स्वप्न नक्की पूर्ण करू, असा मला ठाम विश्वास आहे असे सुनेत्रा पवारांनी यावेळी सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed