मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. या अपघातात 15 प्रवासी जखमी झाले आहेत. या प्रकरणी पोलिसांकडून चारचाकी गाडी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
अमुलकुमार जैन, रायगड : रायगड जिल्ह्यातील इंदापूर (ता. माणगाव) हद्दीत मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर शनिवारी (28 फेब्रुवारी) पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात घडला. भरधाव वेगातील इर्टिगा कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या आयशर बसला जोरदार धडक दिल्याने बसखाली उभे असलेले 15 प्रवासी जखमी झाले. होळी सणासाठी आनंदाने निघालेल्या प्रवासाला या अपघाताने रक्तरंजित वळण मिळाले. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईहून गावाकडे जाणारी आयशर बस (क्र. MH-48-CB-5492) ही दुसऱ्या पंक्चर झालेल्या बसमधील टायर बदलण्यासाठी इंदापूर येथील माहीज हॉटेलसमोर थांबली होती. काही प्रवासी बसखाली आणि रस्त्याच्या कडेला उभे होते. त्याचवेळी मुंबईकडून गोव्याकडे जाणारी इर्टिगा कार (क्र. MH-09-FY-6600) भरधाव आणि बेदरकारपणे येत बसच्या डाव्या बाजूस घासून खाली उभ्या प्रवाशांना जोरदार धडक देऊन गेली.
या अपघातात जयहरी गोविंद मालप (वय ५६), स्वरूप सुदर्शन केंद्रे (वय १३), सुमिवी सुदर्शन केंद्रे (वय ३८), घबन विठोबा देवडे (वय ५५), निशान बबन देवडे (वय २७), सुप्रिया सुनिल केंद्रे (वय ४४), पूजा सुरेश पेलकन (वय २६), कस्तुब शशिकांत लाम्बे (वय १६), सुरेश सखाराम येलकर (वय ५६), जानवी विवेक रेशीम (वय ३६), निर्मला रामदास सातगोडे (वय ५३), प्रगती हिरलेकर (वय ३५), साहील केंद्रे (वय १८) आणि शेजल केंद्रे (वय २०) यांसह एकूण १५ जण जखमी झाले. काहींना किरकोळ तर काहींना गंभीर दुखापती झाल्याची माहिती आहे. जखमींना तत्काळ उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात हलविण्यात आले.
अपघातानंतर काही काळ महामार्गावर वाहतूक विस्कळीत झाली होती. स्थानिक नागरिकांनी आणि प्रवाशांनी मदतकार्य करत जखमींना बाहेर काढले. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून ‘बेफाम वेगाचा कहर’ अशी प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहे. या प्रकरणी माणगाव पोलीस ठाणे येथे कॉ. गु. रजि. नं. ६०/२०२६ अन्वये भा.न्या.सं. कलम १२५ (अ), १२५ (ब), २८१ तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ अंतर्गत दिग्विजय पांडुरंग सुतार (रा. भुदरगड, जि. कोल्हापूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारचालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून निष्काळजीपणे वाहन चालवल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
मुंबई–गोवा महामार्गावर वारंवार घडणाऱ्या अपघातांमुळे सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. विशेषतः पंक्चर किंवा तांत्रिक बिघाडामुळे रस्त्याकडेला उभ्या वाहनांभोवती पुरेशी खबरदारी घेतली जात नसल्याचेही या घटनेतून स्पष्ट झाले. वेगमर्यादा, योग्य सिग्नलिंग आणि रात्रीच्या वेळी सुरक्षितता उपाय काटेकोरपणे राबविण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. होळीच्या आनंदमय प्रवासात घडलेल्या या दुर्घटनेने अनेक कुटुंबांवर काळी छाया पसरली असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.
लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.
चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.
चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.
खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा