• Fri. Mar 6th, 2026

    Pune PMP Bus: पुण्यातील पठ्ठ्याने कहरच केला! बसचा फुकट प्रवास करण्यासाठी शक्कल लढवली, पण एका चुकीने सगळा खेळ अंगलट

    Pune PMP Bus: पुण्यातील पठ्ठ्याने कहरच केला! बसचा फुकट प्रवास करण्यासाठी शक्कल लढवली, पण एका चुकीने सगळा खेळ अंगलट

    Pune Bus News: पीएमपीच्या अधिकाऱ्यांनी तरुणाकडे चौकशी करून त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. या प्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पुण्यातील पठ्ठ्याने कहरच केला! बसचा फुकट प्रवास करण्यासाठी शक्कल लढवली, पण एका चुकीने सगळा खेळ अंगलट(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म. टा. प्रतिनिधी, पुणे: पीएमपीचे ‘आपली पीएमपीएमएल’ नावाचे अधिकृत मोबाइल ॲप आहे. या ॲपवरून प्रवाशांना बसचे लाइव्ह लोकेशन दिसते; तसेच तिकीट, दैनंदिन पासदेखील काढता येतो. २६ फेब्रुवारीला सकाळी ॲपचे सर्व्हर डाउन झाले होते. त्यामुळे कोणत्याही प्रवाशांचे तिकीट व पास ॲपवरून निघत नव्हता. याबाबत प्रवाशांकडून तक्रारीदेखील येत होत्या. त्याचवेळी आरोपी कौस्तुभ हा सातारा रस्त्यावरील बीआरटी मार्गातून प्रवास करीत असताना त्याने वाहकाला ॲपवरून दैनंदिन पास काढल्याचे सांगितले; पण पासच निघत नसल्याचे माहिती असल्यामुळे वाहकाने त्याच्या पास व्यवस्थित पाहिला. त्याच्याकडे कोणत्या ॲपवरून पास काढल्याची विचारणा केली.

    आरोपीने पीएमपीच्या ॲपसारखेच बनावट ॲप दाखवून हा पास काढल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्या वाहकाने वरिष्ठांना माहिती देऊन त्याबाबत पोलिसांकडे तक्रार दिली. हा तरुण शिक्षण घेत असून, त्याने काही दिवसांपूर्वी हे ॲप तयार केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

    पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) अधिकृत मोबाइल ॲपसारखेच बनावट ॲप तयार करून त्याद्वारे दैनंदिन पास काढून मोफत प्रवास करताना एक तरुण गुरुवारी आढळला.

    याबाबत पीएमपीचे साहेबराव बडे यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार कौस्तुभ शैलेश मांजरेकर (वय २४, रा. फ्लॅट क्र. १५, प्रीतम हाइट्स, बालाजीनगर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कौस्तुभ हा २६ फेब्रुवारी रोजी सकाळी सव्वादहाच्या सुमारास पीएमपी बसमधून सातारा रस्त्यावर प्रवास करीत होता. त्या वेळी त्याने पीएमपीच्या मोबाइल ॲपवरून पास काढल्याचे वाहकाला सांगितले. वाहकाने ते पाहिल्यानंतर संशय आला. त्या वेळी तो पास व ॲप बनावट असल्याचे दिसून आले. त्याने बनावट दैनंदिन पास तयार करून तो अधिकृत असल्याचा भास निर्माण केला. या खोट्या पासच्या आधारे त्याने पुणे शहरात बसने विनातिकीट/विनापास मोफत प्रवास केल्याचे समोर आले आहे. या प्रकारामुळे पीएमपी कंपनीची आर्थिक फसवणूक झाल्याची तक्रार देण्यात आली आहे.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे | २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधण्याचेही काम करत आहे. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी लोकमत, न्यूज १८ लोकमत आणि एबीपी माझा या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून मुंबईतील रूईया महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा