• Sat. Mar 7th, 2026

    Jalgaon Crime : सोशल मीडियावर मैत्री, प्रेम अन् वाद, प्रियकराने विवाहीत प्रेयसीच्या घरी जाऊन घेतला जीव, नंतर स्वत:लाही संपवलं

    Jalgaon Crime : सोशल मीडियावर मैत्री, प्रेम अन् वाद, प्रियकराने विवाहीत प्रेयसीच्या घरी जाऊन घेतला जीव, नंतर स्वत:लाही संपवलं

    जळगावात धक्कादायक घटना घडली आहे. एका विवाहीत प्रेयसीची प्रियकराने तिच्या राहत्या घरात जाऊन तिला संपवलं. त्यानंतर त्याने स्वत:ला देखील संपवलं आहे. या घटनेमुळे चोपडा तालुक्यात खळबळ उडाली आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    निलेश पाटील, जळगाव : जळगावमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 40 वर्षीय विवाहीत प्रेयसी वेळ देत नसल्याचा राग मनात धरुन 40 वर्षीय प्रियकर हा तिच्या घरात गेला. त्याने महिलेवर पिस्तूल रोखत गोळी झाडली आणि त्यानंतर स्वत:वरही गोळी झाडली. या घटनेत दोघांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे जळगावच्या चोपडा तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना चोपडा तालुक्यातील अकुलखेडा या गावात घडली आहे. घटना घडली तेव्हा महिलेचा पती जगदीश पाटील हे घरी नव्हते. ते कामानिमित्त बाहेरगावी गेले होते.

    अकुलखेडा येथे जगदीश काशिनाथ पाटील यांच्या राहत्या घरात अनिता जगदीश पाटील आणि देवा सुरेश धनगर (वय 40 वर्ष) हे रक्तबंबाळ अवस्थेत आढळून आले. जगदीश पाटील यांची मुलगी शनिवारी (28 फेब्रुवारी) सकाळी साडेदहाच्या सुमारास घरी परत आल्यानंतर तिने रक्तात माखलेले दोन मृतदेह पाहून हंबरडा फोडला. तिने तातडीने घटनेची माहिती शेजाऱ्यांना दिली.

    नेमकं प्रकरण काय?

    जगदीश काशिनाथ पाटील यांची पत्नी अनिता जगदीश पाटील आणि देवा सुरेश धनगर यांची इंस्टाग्रामवर ओळख झाली होती. या इंस्टाग्रामवरील ओळखीचं रुपांतर मैत्रीत आणि नंतर पुढे प्रेमात झालं होतं. काही दिवसांपासून प्रेयसी अनिता ही देवा धनगर याला वेळ देत नसल्या कारणाने तो रागावला होता. याच रागातून देवा धनगर रागाच्या भरात अनिता पाटील हिच्या अकुलखेडा येथील राहत्या घरी गेला. तिने त्याने वेळ का देत नाही? म्हणून जाब विचारला. यातून दोघांमध्ये वाद झाल्याची शक्यता आहे. याच वादात देवा धनगरने गावठी पिस्टलने अनिताच्या डोक्यात गोळी झाडून तिची हत्या केली. यानंतर देवा धनगरने स्वतःवरही गोळी झाडून स्वतःलाही संपवले, अशीदेखील माहिती समोर आली आहे.

    घटनास्थळी मयत देवा धनगर याची दुचाकी आढळली आहे. ती दुचाकी पोलिसांनी जप्त केली आहे. घटनेची माहिती मिळतातच उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब घोलप आणि शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर सावळे यांनी घटनास्थळी धाव घेत दोघांचे मृतदेह उपजिल्हा रुग्णालय येथे पाठवले. या प्रकरणी पुढील तपास अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली मधुकर सावळे हे करीत आहेत. दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय येथे पाठवण्यात आले होते.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.

    चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.

    चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.

    खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा