• Tue. Sep 22nd, 2026

सहाव्या मजल्यावरून सहा कामगार पडले दुर्घटनेत एका कामगाराचा बळी, एकाची स्थिती गंभीर

ByMH LIVE NEWS

Feb 28, 2026
सहाव्या मजल्यावरून सहा कामगार पडले दुर्घटनेत एका कामगाराचा बळी, एकाची स्थिती गंभीर

मुंबई

 चेंबुरमध्ये एका इमारतीचं बांधकाम सुरू असताना सहाव्या मजल्यावरून सहा कामगार पडले. ही धक्कादायक घटना शनिवारी सकाळी चेंबुरच्या सुभाष नगर भागात घडली आहे. या सहा जणांनापैकी एकाचा जागीच मृत्यू झाला असून इतर पाच जणं गंभीर जखमी आहेत. जखमींना सध्या मुंबईतील राजावडी रुग्णालयात दाखल केलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

कुठे झाली दुर्घटना?

चेंबूरच्या सुभाष नगरमधील इमारत क्रमांक 36मध्ये ही घटना शनिवारी दुपारी 12 वाजून 5 मिनिटांनी घडली आहे. बांधकाम सुरू असताना कामगारांनी सेफ्टी किट न वापरल्यामुळे ते पडले असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. सुभाष नगरमधील इमारतीत हे सहा कामगार विटांचं काम करत होते. त्यावेळी हे सहाजण सहाव्या मजल्यावरून खाली पडले. घटनास्थळावरील स्थानिकांनी तातडीने सर्व कामगारांना रुग्णालयात दाखल केलं.

राजावाडी रुग्णालयात जाताच रामाल्लू या 55 वर्षीय कामगाराला डॉक्टरांनी मृत घोषित केलं. उर्वरित पाच कामगारांवर सध्या उपचार सुरू आहेत. शिवाय 22 वर्षीय कामगार गुनाधर राय हा गंभीर जखमी असून त्याच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. उसराई (वय 30), रमेश राय (वय 25), विजय (वय 35) आणि संदीप (वय 27) अशी जखमींची नावं आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, कामगारांच्या सुरक्षिततेवरती पुन्हा एकदा प्रश्न चिन्ह निर्माण झालं आहे.

आज सकाळीच आणखी एक दुर्घटना

मुंबईमध्ये काही दिवसांपूर्वीच मेट्रोच्या कामादरम्यान स्लॅब कोसळून भीषण दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला होता. यानंतर आज सकाळीच पुन्हा एकदा अशीच एक दुर्घटना पुन्हा घडली आहे. मुंबईत वरळी-शिवडी उन्नत मार्गाच्या कामादरम्यान लोखंडी रॉड कोसळला आहे. विकसाकामांवेळी झालेली या महिन्यातील ही मुंबईमधील दुसरी दुर्घटना आहे. हा लोखंडी रॉड एका व्यक्तीवर कोसळला आहे. यामुळे त्यांना गंभीर जखमा झाल्या आहे. के ई एम रुग्णालय परिसरात ही दुर्घटना घडली असून, जखमी व्यक्तीवर सध्या उपचार सुरू आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed