Solapur Patil Couple ends life : अभिषेकच्या त्रासाला कंटाळून सोमनाथ धानप्पा पाटील आणि पत्नी श्रीदेवी सोमनाथ पाटील यांनी विष प्राशन केले.
अभिषेकच्या त्रासाला कंटाळून सोमनाथ धानप्पा पाटील (वय ४०) आणि श्रीदेवी सोमनाथ पाटील (वय ३५) या पती पत्नीने विष प्राशन केले. शुक्रवार 27 फेब्रुवारी रोजी सकाळी सहा वाजता ही घटना उघडकीस आली होती. सोलापूर अक्कलकोट रोड एमआयडीसीतील कलावती नगरात ही घटना घडली.
काय आहे प्रकरण?
आयुष्याची अखेर करण्याअगोदर पाटील दाम्पत्याने लिहिलेल्या चिठ्ठीतून धक्कादायक माहिती समोर आली आहे. कर्नाटक राज्यातील विजयपूर येथील तरुणाने ओळख वाढवून त्रास दिल्याचे चिठ्ठीत स्पष्ट नमूद केले आहे. एमआयडीसी पोलिसांत रात्री उशिरा अभिषेक दत्तात्रय कोरे (वय २६, रा. विजयपूर) याच्याविरुद्ध जीव देण्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. विजयपूर येथून त्याला अटक करत शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले.
विष पिऊन मुलींच्या शेजारीच झोपले
सोमनाथ पाटील आणि श्रीदेवी पाटील या पती पत्नीला दोन मुली आहेत. मोठी मुलगी इयत्ता पाचवीत तर धाकटी इयत्ता तिसरीत शिकते. बाहेर जाताना ते घराला बाहेरुन कुलूप लावून गेले होते. ते रात्री घरी परतले तेव्हा मुली झोपी गेल्या होत्या. सकाळी त्या जेव्हा उठल्या तेव्हा शेजारच्या अंथरुणात आई बेशुद्ध अवस्थेत तर वडील तोंडाला फेस आल्याच्या स्थितीत होते. ते पाहून दोन्ही मुली घाबरल्या आणि त्यांनी तातडीने आजोबा आणि काकांना कॉल केला होता.
Crime News : मैत्रिणीसोबत हॉटेलात राहायला गेला, 56 वर्षीय पुरुषाचा अचानक मृत्यू, पोस्टमार्टममध्ये कारण समजलं, महिलेने सांगितलं रात्री काय काय घडलं
पोलिसांनी अधिकृत माहिती दिली
सोमनाथ आणि श्रीदेवी यांना अभिषेक कोरे याचा मोठा त्रास होता, अशा अशयाची चिठ्ठी पोलिसांना मिळाली आहे. पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी अधिकृतपणे माहिती देताना सांगितले,अभिषेक कोरे याच्या त्रासाला कंटाळून त्यांनी जीव दिल्याचे प्राथमिक तपासातून दिसत आहे . अभिषेक कोरे विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात आयुष्य संपवण्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. त्याला विजयपूर (कर्नाटक) येथून ताब्यात घेतले आहे, कोर्टात हजर केले आहे, तपासातून आणखी माहिती समोर येणार आहे अशी माहिती पोलिस आयुक्त एम राजकुमार यांनी दिली आहे.
Crime News : आईने चमच्यातून काहीतरी भरवलं; चौकोनी कुटुंबाचा आत्मघात, बचावलेल्या धाकट्या लेकीचा जबाब निर्णायक, छळवादी तरुणाला अटक
अभिषेकविरुद्ध सांगोल्यात अत्याचाराचा गुन्हा
संशयित आरोपी अभिषेक कोरे याच्याविरुद्ध एका महिलेवर अत्याचार केल्याचा गुन्हा सांगोला पोलिस ठाण्यात दाखल आहे. त्याने पीडित महिलेशी ओळख वाढवली. त्यानंतर त्याचा गैरफायदा घेऊन तिच्यावर अत्याचार केले. महिलांशी ओळख वाढवून त्यांचा गैरफायदा घेण्याच्या या वृत्तीचा संशय व त्याचे खरं रुप समोर आल्याने श्रीदेवी पाटील या त्याच्यापासून अंतर राखून होत्या. मात्र त्यानंतरही त्याने त्यांचा पिच्छा न सोडता सतत त्रास दिल्याने पाटील दाम्पत्याने जीवन संपवण्याचा निर्णय घेतला असावा, असेही पोलिसांनी सांगितले.
Solapur | महापौरपदी मराठा समाजाची वर्णी न लागल्याने मराठा समाज आक्रमक, मुंडन करून निषेध
