बुलढाणा जिल्ह्याला हादरवणारी घटना समोर आली आहे. मोताळा तालुक्यातील पोफळी येथे किरकोळ वादातून २५ वर्षीय अनिकेत सुरडकरची पाच जणांनी लोखंडी रॉड आणि काठ्यांनी बेदम मारहाण करून निर्घृण हत्या केली. याप्रकरणी…
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, अनिकेत निवृत्ती सुरडकर ( अंदाजे वय 25 ते 30, रा. पोफळी) असे मयताचे नाव आहे. शुक्रवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास पोफळी येथील विलास राजाराम चौधरी यांच्या शेतात ही घटना घडली. मृतक अनिकेत आणि आरोपी हे एकाच गावातील असून, त्यांच्यात गेल्या काही काळापासून किरकोळ कारणांवरून वाद सुरू होते. आज याच जुन्या वादाचे पर्यावसान टोकाच्या संघर्षात झाले.
पाच जणांकडून जीवघेणा हल्ला
वाद विकोपाला गेल्यानंतर पाचही आरोपींनी मिळून अनिकेतला गाठले. लाठ्या-काठ्या आणि लोखंडी रॉडने त्याच्या डोक्यावर, छातीवर, मानेवर, पाठीवर आणि पायावर वार करण्यात आले. गंभीर जखमी झाल्याने अनिकेतचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.
Solapur News: मम्मी-पप्पा उठत का नाहीत? तोंडाला फेस पाहून मुली हादरल्या; सोलापुरात पती-पत्नीचा रहस्यमय मृत्यू
पाच आरोपी अटकेत
या प्रकरणी मृतक अनिकेतचा चुलत भाऊ विजय सुरडकर यांनी धामणगाव बढे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी तत्काळ कारवाई करत खालील ५ आरोपींना अटक केली आहे:
१) ब्रम्हानंद ऊर्फ धम्मा राजाराम सुरडकर (वय ३४)
२) लकी ऊर्फ प्रफुल्ल संतोष इंगळे (वय २२)
३) कृणाल जानराव सुरडकर (वय २०)
४) निलेश बाळ बोदडे (वय ३०)
५) क्रिष्णा रमेश अंभोरे (सर्व रा. पोफळी, ता. मोताळा)
Chhatrapati Sambhajinagar Crime: छत्रपती संभाजीनगरमध्ये नायजेरियन तरुणांवर महिलेशी गैरवर्तनाचा आरोप, जमावाकडून चोप
पोलीस कारवाई
धामणगाव बढे पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. (BNS) २०२३ च्या कलम १०३, १८९(२), (४), १९०, १९१(२) (३), ३५१(२) (३), ३५२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार नागेश जायले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक करत आहे.
