• Fri. Mar 6th, 2026

    Jalgaon Accident : जळगावात पाळधी-तरसोद महामार्गावर चार ते पाच वाहनांचा भीषण अपघात

    Jalgaon Accident : जळगावात पाळधी-तरसोद महामार्गावर चार ते पाच वाहनांचा भीषण अपघात

    जळगाव शहरापासून काही अंतरावर असणाऱ्या पाळधी-तरसोद महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडली आहे. या अपघातात चार ते पाच वाहनांची धडक झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    जळगाव : जळगामधून मोठी बातमी समोर येत आहे. जळगावच्या पाळधी-तरसोद या नवीन बायपास महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडली आहे. या अपघातात चार ते पाच वाहनांची एकमेकांना धडक झाली आहे. एक कंटनेर महामार्गावर उलटल्याने इतर वाहानांचीदेखील एकमेकांना धडक बसली. कंटनेर चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे हे कंटनेर महार्गावर पलटी झालं. त्यानंतर भीषण अपघाताची घटना घडली. या अपघातात वाहनांचा चक्काचूर झाला आहे. अतिशय भीषण असा अपघात आहे. या अपघातात जखमी झालेल्या नागरिकांची संख्या अद्याप समजू शकलेली नाही. पण या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

    अपघाताच्या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली. महामार्गाने प्रवास करणाऱ्या इतर प्रवाशांनी पोलिसांना फोन करुन या घटनेची माहिती दिल्याची शक्यता आहे. तसेच आजूबाजूच्या गावातील नागरिक मदतीसाठी पुढे धावली. जखमींना तातडीने जवळील रुग्णालयात नेण्यात आल्याची माहिती आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. तसेच महामार्गावरील अपघातग्रस्त वाहनं बाजूला करण्याचे देखील काम प्रशासनाकडून सुरु आहेत.

    या घटनेनंतरचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत वाहनांचा चक्काचूर झालेला दिसतोय. यामध्ये चार चाकी कार, ट्रॅक्टर, कंटेनर अशा विविध गाड्या दिसत आहे. रात्रीच्या वेळी हा अपघात असल्याने महामार्गावर काहीसा अंधार दिसतोय. पण स्थानिकांनी तिथे गर्दी केल्याचं देखील बघायला मिळत आहे. या घटनेमुळे अनेकांना धक्का बसला आहे.

    दोन जण गंभीर जखमी

    या घटनेत आता दोन जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. दोन्ही जखमींवर सध्या उपचार सुरु आहेत. या घटनेत वाहनांचं देखील मोठं नुकसान झालं आहे. या घटनेनंतर आता पोलीस तपास केला जातो का? आणि तपासात नेमकी काय माहिती समोर येते? ते पाहणं देखील महत्त्वाचं आहे. दरम्यान, जखमी लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थना स्थानिकांकडून केली जात आहे. तसेच राज्यात अपघाताच्या घटना वारंवार घडताना दिसत आहे. आज दुपारी खोपोली जवळ अपघाताची घटना समोर आली होती. त्यानंतर आता जळगावात अपघाताची घटना समोर आली आहे.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.

    चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.

    चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.

    खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा