Mumbai News: मुंबई महापालिकेने राबविलेल्या विशेष स्वच्छता मोहिमेत तब्बल २४९८.६६ मेट्रिक टन कचरा संकलित करण्यात आला आहे.
महापालिकेने ९ जुलै ते १९ जुलै २०२६ या कालावधीत मुंबईतील प्रमुख समुद्रकिनाऱ्यांवर ही मोहीम राबवली. या काळात प्लास्टिक, थर्माकोल, लाकडी अवशेष, जलवनस्पती तसेच इतर प्रकारचा घनकचरा मोठ्या प्रमाणावर आढळून आला. संकलित कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली.
BMC FDA Action: तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई! मुंबई महापालिका मुख्यालयातील कॅन्टीन सील, काय कारण?
जुहू समुद्रकिनाऱ्यावरून सर्वाधिक १,८२५ मेट्रिक टन कचरा उचलण्यात आला. त्यानंतर वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावरून २७७.६० मेट्रिक टन, दादर-माहीम किनाऱ्यावरून १५२.१० मेट्रिक टन, चिंबई-वारिंगपाडा किनाऱ्यावरून १२७.२० मेट्रिक टन, मढ-मार्वे किनाऱ्यावरून ४४.२८ मेट्रिक टन, गोराई किनाऱ्यावरून ३८.८२ मेट्रिक टन, तर गिरगाव चौपाटीवरून ३३.६६ मेट्रिक टन कचरा संकलित करण्यात आला.
मुंबईतील समुद्रकिनारे स्वच्छ , सुरक्षित आणि पर्यावरणपूरक ठेवण्यासाठी महापालिका नियोजनबद्ध पद्धतीने काम करत असल्याची माहिती महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनाचे उपायुक्त किरण दिघावकर यांनी दिली. विशेषतः मान्सून काळात भरती – ओहोटीमुळे समुद्रातून मोठ्या प्रमाणावर कचरा किनाऱ्यावर वाहून येतो. तो तातडीने हटवण्यासाठी विशेष स्वच्छता पथके नियुक्त करण्यात आली असून , ही पथके नियमितपणे किनाऱ्यांची पाहणी करून कचरा संकलन आणि विल्हेवाटीचे काम करत आहेत, असे त्यांनी सांगितले.
समुद्रकिनाऱ्यांची स्वच्छता राखण्यासाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. कचरा नाले, नद्या किंवा समुद्रात न टाकता योग्य ठिकाणीच टाकावा, असे आवाहनही महापालिकेने केले आहे.
Sachin Ahir : नेत्याच्याच घरी डल्ला, सचिन अहिरांच्या घरात चोरी, 2 कोटी 65 लाखांचा ऐवज लंपास, हिऱ्यांचे दागिने अन् सोन्याचे बिस्किटे गायब
समुद्रकिनारा—–लांबी—-संकलित कचरा
गिरगाव चौपाटी—-१.१ किमी—-३३.६६ मेट्रिक टन
दादर-माहीम—–५ किमी—-१५२.१० मेट्रिक टन
चिंबई-वारिंगपाडा—–३.५ किमी—-१२७.२० मेट्रिक टन
मढ-मार्वे—– ८ किमी—-४४.२८ मेट्रिक टन
जुहू —–६ किमी—-१,८२५ मेट्रिक टन
वर्सोवा—–४.५ किमी—-२७७.६० मेट्रिक टन
गोराई—–सुमारे ७ किमी—-३८.८२ मेट्रिक टन
एकूण—- २,४९८.६६ मेट्रिक टन
