• Sat. Jul 25th, 2026
    भूकंपापूर्वीच आपोआप थांबेल बुलेट ट्रेन, ताशी ३२० किमी वेगाने धावणार; मार्गाच्या विद्युतीकरणाला गती

    म.टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गाच्या विद्युतीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. ताशी ३२० किमी वेगाने धावणाऱ्या बुलेट ट्रेनसाठी अखंड आणि स्थिर वीजपुरवठा मिळावा, यासाठी देशात प्रथमच २×२५ केव्ही ओव्हरहेड ट्रॅक्शन प्रणालीचा वापर करण्यात येत आहे. राष्ट्रीय वीज ग्रीडमधून विशेष सबस्टेशनमध्ये आणि त्यानंतर बुलेट मार्गावरील सबस्टेशनच्या माध्यमातून वीजपुरवठा केला जाणार आहे.

    कसा फायदा होणार?

    देशात प्रथमच वापरल्या जाणाऱ्या प्रगत कंपाउंड कॅटेनरी प्रणालीच्या माध्यमातून बुलेट ट्रेनला वीजपुरवठा केला जाईल. ताशी ३२० किमी वेगाने धावताना ट्रेनचा पेन्टोग्राफ ओव्हरहेड वायरमधून सातत्याने वीज घेऊ शकेल, यासाठी प्रत्येक तार अचूक यांत्रिक ताणासह बसविण्यात येत आहे. त्यामुळे वेगवान प्रवासात ठिणग्या उडणे, वीजपुरवठ्यातील चढ-उतार किंवा व्यत्यय टाळणे शक्य होणार आहे.

    Ghatkopar Railway Station: अतिवर्दळीच्या घाटकोपर स्थानकावर नवा ‘उन्नत डेक’, मेट्रो-लोकल कनेक्टिव्हिटी सुधारणार; कसा-कुठे असेल?

    राष्ट्रीय वीज ग्रीडमधून वीज प्रथम विशेष ग्रीड सबस्टेशनमध्ये आणली जाईल. त्यानंतर मार्गिकेवरील १४ ट्रॅक्शन सबस्टेशनच्या माध्यमातून बुलेट ट्रेनला वीजपुरवठा केला जाईल. यापैकी पाच सबस्टेशन महाराष्ट्रात, तर, नऊ गुजरातमध्ये आहेत. राज्यात मुंबई, ठाणे, विरार, बोईसर आणि ठाणे डेपो येथे सबस्टेशन उभारण्यात येतील. गुजरातमध्ये वापी, बिलीमोरा, सुरत, भरूच, वडोदरा, आनंद, अहमदाबाद आणि साबरमती डेपो या ठिकाणी सबस्टेशन असतील.

    एका विद्युत विभागातून दुसऱ्या विभागात प्रवेश करताना वीजपुरवठ्यात अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी ३१ स्विचिंग पोस्ट उभारल्या जाणार आहेत. बिघाड झाल्यास संबंधित भाग तातडीने विलग करण्याची सुविधाही आहे. स्थानके, सिग्नलिंग, देखभाल केंद्रे आणि अन्य पायाभूत सुविधांसाठी १६ वितरण सबस्टेशन उभारण्यात येत आहेत. बुलेट ट्रेनसाठी १,१२५ किलोमीटर ट्रॅकवर पसरलेल्या विशष ओव्हरहेड विद्युत तारांचे जाळे उभारण्यात आले आहे. सुमारे १०.५ मीटर ते १४.५ मीटर उंच असलेल्या खांबांवर कंपाऊंड कॅटेनरी प्रणाली उभारल्या जातील. प्रत्येक ट्रॅक्शन सबस्टेशनमध्ये भूकंपाचा लवकर शोध घेणारे सिस्मोमीटर बसवले जाईल, जे काही सेकंदात भूकंपाची हालचाल ओळखून संरक्षणात्मक उपाययोजना सुरू करू शकेल, ज्यामुळे भूकंप झाल्यास बुलेट ट्रेन तात्काळ थांबवता येतील.

    बुलेट ट्रेनचा मार्ग कसा असेल?

    १५ ऑगस्ट २०२७ रोजी मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा पहिला टप्पा सुरू कार्यन्वित होणार आहे. गुजरातमधील सुरत ते बिलिमोरा या पट्ट्यावर सर्वप्रथम ट्रेन धावणार आहे. हा संपूर्ण मार्ग ५०८ किमी लांब आहे. त्यानंतर टप्प्या-टप्प्याने पुढील मार्ग सुरू केले जातील. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनमुळे अंतर केवळ दोन तास सात मिनिटांमध्ये पार करणं शक्य होणार आहे. मुंबई-अहमदाबाद कॉरिडोरनंतर हैदराबादमधून तीन हाय-स्पीड ट्रेन धावणार आहेत. मुंबई-पुणे-हैदराबाद, हैदराबाद-बंगळुरू, हैदराबाद-चेन्नई अशा रेल्वे कॉरिडोरला हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे.

    Maharashtra TimesPune Metro 3: पुणेकरांसाठी तिसरी मेट्रो सज्ज! पहिल्या टप्प्यात सेवा सुरू करण्यास मंजुरी; उद्घाटनासाठी मुख्यमंत्र्यांची प्रतीक्षा

    महाराष्ट्र, गुजरात आणि दादरा आणि नगर हवेली या राज्या आणि केंद्रशासित प्रदेशांमधून बुलेट ट्रेन धावणार आहे. यामध्ये मुंबईत वांद्रे कुर्ला संकुल, ठाणे, विरार, बोईसर, वापी, बिलिमोरा, सूरत, भरूच, वडोदरा, आनंद, अहमदाबाद आणि साबारमती अशा १२ मुख्य स्थानकांवर थांबे असतील.

    मुंबई-पुणे हायस्पीड रेल्वेमुळे अंतर केवळ ४८ मिनिटांत पार होणार आहे. यानंतर महाराष्ट्रातील कोणत्या शहरांमध्ये हाय-स्पीड ट्रेन सुरू केली पाहिजे? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

    पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

    यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

    २०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

    लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed