• Sun. Jul 26th, 2026
    विडी ओढू नकोस, धुराने त्रासलेल्या सहप्रवाशाने फोटो काढल्याचा राग, तिघांचे मुलुंडकर रहिवाशाशी बेशिस्त वर्तन

    Mumbai Local Passenger Fighting : विडीच्या धुराने त्रस्त झालेल्या तक्रारदाराने त्या व्यक्तीला विडी ओढण्यास मनाई करीत त्याचा मोबाइलमध्ये फोटो काढल्याच्या रागातून त्याने आणि त्याच्या सोबत असलेल्या दोघांनी तक्रारदाराला मारहाण केली

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म. टा. प्रतिनिधी, मुंबई : लोकलमध्ये हाणामारीचे सत्र सुरुच असून दोन नव्या घटना समोर आल्या आहेत. या प्रकरणी ठाणे रेल्वे पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. लोकलमध्ये विडी ओढणाऱ्या प्रवाशाला जाब विचारल्याने त्याच्यासह तिघांनी एका प्रवाशाला मारहाण केल्याची घटना ठाणे ते दिघा गाव रेल्वे स्थानकादरम्यान घडली. तर, दिव्यांगासाठी राखीव असलेल्या डब्यात जबरदस्तीने घुसलेल्या दोघांनी एकाला ठाणे ते दिवा स्थानकादरम्यान मारहाण केली.

    विडी ओढल्यावरुन मारहाण

    मुलुंड येथे राहणारे ४६ वर्षांच्या तक्रारदाराने सोमवारी सायंकाळी दिघा येथे जाण्यासाठी ठाणे रेल्वे स्थानकातून नेरूळ लोकल पकडली. ते लोकलच्या मालडब्यातून प्रवास करत होते. त्यावेळी एक व्यक्ती विडी ओढत होती.

    सोनसाखळी आणि पाकीट चोरीला

    विडीच्या धुराने त्रस्त झालेल्या तक्रारदाराने त्या व्यक्तीला विडी ओढण्यास मनाई करीत त्याचा मोबाइलमध्ये फोटो काढला. याच रागातून त्याने आणि त्याच्या सोबत असलेल्या दोघांनी तक्रारदाराला मारहाण केली. यावेळी झटापटीत तक्रारदाराच्या गळ्यातील सोन्याची साखळी, पाकीट चोरीला गेले.
    Maharashtra TimesCrime News : लग्नाआधी काय घडलं सांगू का? ब्यूटिशियनला AI व्हिडिओवरुन चौघांचं ब्लॅकमेल, जीव सोडताना म्हणाली माझे पती खूप चांगले!

    दिव्यांग डब्यात मारहाण

    दुसऱ्या प्रकरणात कल्याण येथील एका ५२ वर्षांच्या व्यक्तीला ठाणे आणि दिवा रेल्वे स्थानकादरम्यान लोकलमध्ये मारहाण झाल्याची घटना नुकतीच घडली. ते मुलुंड-कल्याण असा दिव्यांगांच्या राखीव डब्यातून प्रवास करीत होते. दिव्यांग नसतानाही ठाणे रेल्वे स्थानकात या डब्यात घुसलेल्या दोन व्यक्तींना त्यांनी दिव्यांगाच्या डब्यात न चढण्याबाबत सांगितले. याच गोष्टीचा राग आल्याने या दोघांनी त्यांना मारहाण केली.

    Aaditya Thackeray यांनी आंदोलनातून थेट Abhijeet Dipke यांना कॉल लावला,काय घडलं?

    वाद टाळा, सुरक्षित प्रवास करा

    रेल्वे रूळ ओलांडताना होणारे अपघात आणि मृत्यू रोखण्याबरोबरच लोकल प्रवास अधिक सुरक्षित व वादमुक्त करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) रेल्वे पोलिसांनी विशेष जनजागृती मोहीम राबवली. मुंबई रेल्वे पोलिस आयुक्तालयाच्या मार्गदर्शनाखाली ‘जीवन रक्षा अभियान’ आणि ‘वादमुक्त रेल्वे प्रवास’ या उपक्रमांतर्गत प्रमुख रेल्वे स्थानकांवर प्रवाशांमध्ये जनजागृती करण्यात आली.

    सीएसएमटी स्थानकातील लोकल आणि मेल-एक्स्प्रेस फलाटांना जोडणाऱ्या मार्गासह फलाट क्रमांक ३ आणि ४, सँडहर्स्ट रोड स्थानकातील रूळ ओलांडण्याच्या ठिकाणी तसेच, फलाट क्रमांक १ आणि २वर जनजागृती करण्यात आली. सकाळी १०.१५ ते दुपारी १२.२० या कालावधीत झालेल्या मोहिमेत वरिष्ठ रेल्वे पोलिस अधिकारी, कर्मचारी आणि रेल्वे सुरक्षा दलाचे अधिकारी-कर्मचारी सहभागी झाले.
    Maharashtra TimesCrime News : दादा, प्लीज लवकर माझ्या घरी जा, CCTV मध्ये आई-बाबा पळताना दिसतायत; लेकाचा केविलवाणा फोन, शेजारी जाईपर्यंत उशीर झाला
    प्रवाशांचे लक्ष वेधण्यासाठी यमराजाच्या वेशातील व्यक्तीच्या माध्यमातून रूळ ओलांडण्याचे धोके आणि सुरक्षित प्रवासाचे महत्त्व पटवून देण्यात आले. ‘वाद न घालता प्रवास करा’, ‘स्पीकरवर गाणी लावून प्रवास करू नका’, ‘रेल्वे रूळ ओलांडू नका, जीव धोक्यात घालू नका’, ‘अति घाई संकटात नेई’, ‘शॉर्टकट नको, सुरक्षित मार्ग निवडा’, ‘वेळ वाचविण्यासाठी आयुष्य गमावू नका’ आणि ‘धावती लोकल थांबत नाही, तुम्ही थांबा’ अशा घोषणांद्वारे मेगाफोनवरून प्रवाशांना सतर्क करण्यात आले.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

    पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

    अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

    शैक्षणिक पात्रता
    अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा