• Tue. Jun 16th, 2026

    नव्या ‘मेट्रो 12A’ ची घोषणा, कल्याण-शिळफाटा मार्गे नवी मुंबईला जोडणार; डोंबिवली, कटाई नाका… कसा असेल मार्ग?

    नव्या ‘मेट्रो 12A’ ची घोषणा, कल्याण-शिळफाटा मार्गे नवी मुंबईला जोडणार; डोंबिवली, कटाई नाका… कसा असेल मार्ग?

    Metro Line 12A: कल्याण-तळोजा मार्गावर सुरू होणाऱ्या मेट्रो 12 चा विस्तार करुन मेट्रो लाइन 12 अ सुरू करण्याची घोषणा काल केली गेली आहे. या प्रकल्पासाठी 8414 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    कल्याण: कल्याण तळोजा या ‘मेट्रो १२’ मार्गाच्या विस्तारीकरणाला नगरविकास मंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजुरी दिली आहे. यामुळे ‘मेट्रो १२ अ’ हा प्रकल्प आता कल्याण शिळ फाटामार्गे दहिसर मोरी ते तळोजा असा विस्तारणार आहे. या प्रकल्पासाठी ८ हजार ४१४.५३ कोटीच्या खर्चाला प्रशासकीय मान्यता देण्यात आल्याची माहिती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली. या प्रकल्पासह शहरात एमएमआरडीएच्या माध्यमातून सुरू असलेल्या विकासकामांची पाहणीही खासदार शिंदे यांनी केली.

    अनेक प्रकल्पांची पाहणी

    कल्याण डोंबिवली क्षेत्रातील वाहतुकीचा वेग वाढविण्यासाठी अनेक प्रकल्पांचे काम सुरू आहे. मेट्रो, रेल्वे, रस्ते, उड्डाणपूल, उन्नत मार्ग, रेल्वे पूल, रस्त्यांचे रुंदीकरण यासारख्या प्रकल्पांची कामे सुरू असून अनेक कामे पूर्ण झाली आहेत. त्यातच एमएमआरडीएकडून या प्रकल्पाच्या पूर्ततेसह प्रकल्पासाठी ४ हजार ८९७ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून या प्रकल्पाच्या सद्यस्थितीची पाहणी खासदार डॉ. शिंदे यांनी शुक्रवारी केली. पलावा उड्डाणपूल, मेट्रो १२, तिसरा पत्री पूल, वालधुनी नदी लगत विठ्ठलवाडी स्थानक ते कल्याण नव्या अहिल्यानगर महामार्गापर्यंतचा उन्नत मार्ग आणि कल्याण रिंग रोड या प्रकल्पाची त्यांनी पाहणी केली.Maharashtra TimesMumbai Monorail: मुंबईत पुन्हा धावणार ‘मोनोरेल’! MMRDAची मोठी घोषणा; अधिक सुरक्षित व वेगवान मोनो कधी सुरू होणार?

    प्रकल्पाला गती देण्यासाठी आवश्यक अतिक्रमणे हटवून जागा प्रकल्पासाठी उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. यावेळी विशेष म्हणजे त्यांनी तळोजा मेट्रो १२ च्या विस्तारीकरणाची घोषणा केली. या मार्गाचे विस्तारीकरण केल्याने आता कल्याण शिळ मार्गावरील आणखी काही गावांनादेखील या मेट्रोचा फायदा होणार आहे. मेट्रो १२ मार्ग दोन भागातून जाणार आहे.

    कुठे असतील स्थानकं?

    यातील पहिल्या मार्गातील स्थानके निश्चित करण्यात आली असून दुसऱ्या डोंबिवलीसह, मानपाडा, काटई नाका, ग्रोथ सेंटर, देसाई नाका, पडले गाव, कल्याण फाटा, गोठेघर, दहिसर मोरी, दहिसरगाव, किरवली गाव, रोहींजण आणि खुटारी गाव या भागातील प्रवाशांना याचा फायदा होणार आहे. खुटारी येथे मेट्रो १२ आणि मेट्रो १२ अ एकमेकांशी सलग्न होईल. या मेट्रो मार्गामुळे ग्रामीण भागातून धावणारी ही पहिली मेट्रो ठरणार आहे. भविष्यात मेट्रो १४ बरोबर एकत्र झाल्यास त्याचा फायदा थेट नवी मुंबई, कांजूरमार्ग ते मुंबई प्रवासासाठी होणार आहे.

    Maharashtra TimesMumbai-Vijaydurg Ro-Ro Ferry: शिमग्याला कोकणात जाणं होणार सोपं, मुंबई-विजयदुर्ग रो-रो फेरी 1 मार्चपासून; कसं असेल वेळापत्रत?

    मार्गात विस्तारित काटई नाका ते कल्याण फाटा दरम्यान मेट्रो १४बरोबर एकत्रित ट्रक आणि स्टेशन शेअरिंगचा प्रस्ताव आहे. निळजे डेपो, मेट्रो १४ आणि नॅशनल हायस्पीड रेल्वेच्या ठाणे बुलेट ट्रेन स्थानकाशी या मेट्रो मार्गाने जोडणी केली जाणार आहे. या सुधारित मार्गिकेची एकूण लांबी १८.४ किलोमीटर आहे. त्यातील सध्या सुमारे १०.५ किलोमीटरवर बांधकाम प्रगतीपथावर आहे.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम, मटा ऑनलाईनमध्ये कन्सल्टंट पदावर कार्यरत आहे. प्रामुख्याने क्राइम, सिव्हिक आणि पॉलिटिक्स या बातम्या कव्हर करते. याआधी सहा महिने महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमध्ये कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून काम केले आहे. त्या काळात कॉलेज इव्हेंट्स, शैक्षणिक उपक्रम आणि सोशल मीडियावरील ट्रेंड्सवर बातम्या केल्या. मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून BMM मध्ये पदवी घेतल्यानंतर सध्या के.सी. महाविद्यालयात MA in Communication and Journalism करत आहे. इंटरनॅशनल घडामोडी आणि पॉप कल्चर हे विषय विशेष आवडीचे असून इंग्लिश आणि मराठी या दोन्ही भाषेत वाचन व लेखन करण्याची आवड आहे.… आणखी वाचा