Ahilyanagar Crime : अहिल्यानगर शहरातील विविध ठिकाणी तसेच पुणे जिल्ह्यातील शिरूर येथील एका लॉजवर नेऊन अभिषेक कळमकर यांनी आपल्यावर वारंवार अत्याचार केल्याचे तरुणीने फिर्यादीत नमूद केले आहे
काय आहे प्रकरण?
मोबाईलवर व्हिडिओ कॉल करुन वेळोवेळी कपडे काढण्यास भाग पाडून तासनतास त्रास देत असल्याचा आरोपही पीडितेने केला आहे. या सततच्या मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून अखेर तरुणीने पोलिसांकडे धाव घेतली. अत्याचार करतानाचे व्हिडिओ काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत ब्लॅकमेलिंग केल्याचाही गंभीर आरोप फिर्यादीने केला आहे. या संदर्भातील काही व्हिडिओ पुरावेही पीडितेने पोलिसांकडे जमा केल्याची माहिती समोर आली आहे.
Crime News : आई, तू दुसरा नवरा केलास, मी पुन्हा लग्न केलं तर काय? सख्ख्या माऊलीने जीव घेतला, महाराष्ट्र हादरवणाऱ्या खून प्रकरणाचा छडा
महापौर कळमकर फरार
गुन्हा दाखल होताच माजी महापौर अभिषेक कळमकर फरार झाल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली असून त्यांचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे नगर शहरात संतापाची लाट उसळली असून राजकीय वर्तुळातही तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
Sangli | सुरेश पाटील यांनी जयंत पाटलांकडे भर सभेत भाजपसोबत आघाडीची मागणी केली
युवतीचे अपहरण करून अत्याचार
दुसरीकडे, अहिल्यानगर येथील महाविद्यालयात निघालेल्या युवतीचे अपहरण करून तिला जंगलात नेऊन तेथे पाच दिवस तिच्यावर अत्याचार केल्याची संतापजनक घटना राहुरी तालुक्यात घडली. पोलिसांना तांत्रिक मदतीने तपास करून मुलीचा शोध घेतला. नाशिकच्या जंगलातून तिची सुटका करण्यात आली. मुख्य आरोपी मुक्तर हैदर पठाण याच्यासह त्याला मदत करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेचे गावात तीव्र पडसाद उमटले असून, ग्रामस्थांनी बंदची हाक दिली.
UP Crime : 33 लहान मुलांवर अत्याचार, सिंचन विभाग इंजिनिअरसह पत्नीला मृत्युदंडाची शिक्षा, विकृती पाहून कोर्टाचा संताप
कानडगाव (ता. राहुरी) येथील आदिवासी कुटुंबातील अल्पवयीन मुलगी १३ फेब्रुवारीला महाविद्यालयात जाण्यासाठी बाहेर पडली. ती परत न आल्याने कुटुंबीयांनी पोलिसांकडे तकार दाखल केली. या प्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल केला.
