• Sat. Mar 7th, 2026
    ठाणे पालिका मुख्यालयाच्या दारात आलिशान गाड्यांचा ‘रॉयल’ थाट, नगरसेवकांचा अनोखा रुबाब, कोटींच्या गाड्यांची चर्चा

    Thane Corporators Royal Cars : नगरसेवकांच्या अनोख्या रुबाबाची चर्चा ठाणे महापालिका मुख्यालयामधील अधिकारी – कर्मचाऱ्यांसह आवारात जमलेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये चांगलीच रंगली होती.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    विनित जांगळे, ठाणे : वेलफेयर…डिफेंडर…मर्सिडीज…थार…हायक्रॉस…फॉर्च्युनर या आलिशान गाड्यांची वर्दळ कोणत्याही ‘कार एक्स्पो’मधील नसून ठाणे महापालिका मुख्यालयाच्या आवारातील आहे. निमित्त होते, शुक्रवारी झालेल्या ठाणे पालिकेच्या महासभेचे. या महासभेसाठी उपस्थित राहिलेल्या सर्वपक्षीय नवनिर्वाचित नगरसेवकांच्या लाखो, कोटींच्या गाड्यांचा थाट पाहायला मिळाला. नगरसेवकांच्या अनोख्या रुबाबाची चर्चा मुख्यालयामधील अधिकारी – कर्मचाऱ्यांसह आवारात जमलेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये चांगलीच रंगली होती.

    तब्बल चार वर्षांपासून सुरु असलेला प्रशासक कार्यकाळ संपुष्टात येऊन महापौर – उपमहापौर विराजमान झाल्यानंतर शुक्रवारी ठाणे महापालिकेची सर्वसाधारण सभा झाली. याआधी प्रशासक कार्यकाळ सुरु होण्याआधी कोरोना काळातही पालिका मुख्यालयात नगरसेवकांची वर्दळ कमी झाली होती. त्यामुळे लोकप्रतिनिधींचा फारसा वावर मुख्यालयात नसल्याने अधिकारी – कर्मचारीही सुशेगात होते. मात्र नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर काही दिवसातच महापौर – उपमहापौर निवड झाली. त्यावेळी एकत्र आलेले लोकप्रतिनिधी शुक्रवारी पुन्हा प्रथमच होणाऱ्या महासभेसाठी जमले.

    Thane Royal Car 2  Maharashtra Times

    आलिशान गाड्यांसह दाखल

    या पार्श्वभूमीवर जुन्या नगरसेवकांसह नव्याने निवडून आलेल्या नगरसेवकही आलिशान गाड्यांसह मुख्यालयात दाखल झाले. त्यातील काही गाड्यांची किंमत दोन ते अडीच कोटींच्या घरात असून या महागड्या गाड्यांच्या शर्यतीत सत्ताधाऱ्यांसह विरोधी बाकावर बसणाऱ्या नगरसेवकही आघाडीवर होते. तर एकाच कुटुंबामधून ठाणे पालिकेवर निवडून आलेले सदस्य एकाच गाडीतून सभागृहात दाखल झालेले पाहायला मिळाले.
    Maharashtra TimesMaharashtra Politics : ठाकरे आणि शिंदेंची हातमिळवणी, कुठे घडला चमत्कार? दोन्ही शिवसेनांच्या युतीने राजकारणात चर्चांना उधाण

    ‘धर्मवीर’ चित्रपटातील प्रसंगाची आठवण

    विशेष म्हणजे, पहिल्याच टर्ममध्ये लाखोंच्या गाड्या घेऊन पालिकेत एंट्री मारणाऱ्या नगरसेवकांकडे पाहून ‘धर्मवीर’ चित्रपटात स्व. आनंद दिघे नवख्या नगरसेवकाला जाब कसा विचारतात, त्या प्रसंगाची चर्चा अनेक कार्यकर्त्यांकडून दबक्या आवाजात सुरु होती. आपल्या नगरसेवकाची गाडी इतरांपेक्षा कशी भारी आहे, अशीही स्पर्धा या निमित्ताने पाहायला मिळाली.
    Maharashtra TimesAbhishek Kalamkar : VC करुन सारखे कपडे काढायला सांगायचा, पुण्यातील लॉजवर वारंवार अत्याचार, NCP SP पक्षातील माजी महापौरांवर गुन्हा

    Thane Royal Car 3  Maharashtra Times

    वाहतूक पोलिस दिमतीला

    मुख्यालयाच्या आवारात महापौर व उपमहापौरपदाच्या निवडणुकीदरम्यान नगरसेवकांच्या गाड्यांच्या बेशिस्त पार्किंगपायी प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. याबाबत ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये वृत्तही प्रसिद्ध झाले होते. या अनुषंगाने महासभेच्या निमित्ताने वाहतूक शाखेने वाहतूक पोलिस, वॉर्डन तैनात केले होते. त्यांनी नगरसेवक पालिका मुख्यालयात दाखल झाल्यानंतर संबंधित वाहनांच्या चालकांना या गाड्या मुख्य प्रवेशद्वारानजीक उभ्या न करता इतरत्र पार्क करण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे वाहतूक सुरळीत मार्गस्थ झाली.

    जास्त खुमखुमी असेल तर ठाणे, कल्याणमधून लोकसभा लढवा; गणेश नाईकांना श्रीकांत शिंदेंचं ओपन चॅलेंज

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश सतीश बेंद्रे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक पदावर कार्यरत आहेत. गेल्या तीन वर्षांपासून ते मटासोबत काम करत आहेत. राजकीय, गुन्हेगारी आणि मनोरंजन या विषयातील बातम्यांमध्ये त्यांचा विशेष हातखंडा आहे. ब्रेकिंग न्यूजसोबतच निवडणूक विषयक विश्लेषण करण्यात त्यांना अधिक रस आहे. त्यांनी झेविअर्स कॉलेजमधून मास कम्युनिकेशनचे पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. आतापर्यंत एबीपी माझा, टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 12 वर्षांहून अधिक काळचा अनुभव त्यांना आहे… आणखी वाचा