Pune Man beaten for objecting Honking Horn : आरोपी दुचाकीस्वार बाहेरून सोसायटीच्या पार्किंगमध्ये आला आणि भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या मित्राला बोलावण्यासाठी एकसलग दुचाकीचा कर्णकर्कश्श हॉर्न वाजवला.
या प्रकरणी ५९ वर्षीय पीडित व्यक्तीने तक्रार दिली आहे. त्यावरून दुचाकीस्वार आणि त्याच्या सात-आठ साथीदारांविरुद्ध स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकं काय घडलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ फेब्रुवारीला दुपारी साडेचारच्या सुमारास मारहाणीचा प्रकार घडला. तक्रारदार न्यू कॉमनवेल्थ सोसायटीत राहायला आहेत. आरोपी दुचाकीस्वार बाहेरून सोसायटीच्या पार्किंगमध्ये आला. त्याचा मित्र तेथे भाड्याने राहतो. त्याने मित्राला बोलावण्यासाठी एकसलग दुचाकीचा कर्णकर्कश्श हॉर्न वाजवला.
हॉर्न वाजवू नका
आवाजामुळे त्रस्त झालेल्या तक्रारदाराने त्याला हॉर्न बंद करण्यास सांगितले. ‘दुपारची वेळ आहे. लोक सोसायटीतील लोक झोपले आहेत. हॉर्न वाजवू नका,’ असे सांगितले. त्यावरून ‘मला सांगणारा तू कोण,’ असे म्हणून आरोपीने शिवीगाळ करून वाद घातला. काही वेळात त्याचे साथीदार घटनास्थळी आले आणि त्यांनी नागरिकाला शिवीगाळ करून मारहाण केली. बॅटने हल्ला करून गंभीर दुखापतही करण्यात आली. या घटनेनंतर तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
UP Crime : 33 लहान मुलांवर अत्याचार, सिंचन विभाग इंजिनिअरसह पत्नीला मृत्युदंडाची शिक्षा, विकृती पाहून कोर्टाचा संताप
शहरात सायलेन्सरमध्ये फेरफार करून कर्णकर्कश आवाज करणाऱ्या दुचाकीस्वारांविरुद्ध पोलिसांनी विशेष मोहीम राबवली होती. ध्वनिप्रदूषण करणाऱ्यांविरुद्ध कठोर भूमिका घेतली जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
हडपसरमध्ये मध्यरात्री भीषण आग; ११ झोपड्या जळून खाक
दुसरीकडे, पुण्यातील हडपसर परिसरात मध्यरात्री भीषण आग लागून ११ झोपड्या पूर्णतः जळून खाक झाल्या. लोखंडी उद्यानाजवळ, रांका ज्वेलर्सच्या मागील बाजूस मजूर व कामगारांची वस्ती असून पत्र्याच्या व बांबूच्या झोपड्यांना आग लागल्याने काही क्षणांतच आगीने संपूर्ण परिसर वेढला.
Abhishek Kalamkar : VC करुन सारखे कपडे काढायला सांगायचा, पुण्यातील लॉजवर वारंवार अत्याचार, NCP SP पक्षातील माजी महापौरांवर गुन्हा
आगीत झोपड्यांमधील घरगुती साहित्य, कपडे, कागदपत्रे तसेच संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्या. अनेक कुटुंबांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. नागरिक गाढ झोपेत असताना ही घटना घडल्याने एकच खळबळ उडाली.
रोहित ज्या पद्धतीने मुद्दे मांडतोय त्याची काळजी वाटते, सुप्रिया सुळेंकडून सुरक्षेची मागणी
