• Fri. Mar 6th, 2026

    Kanjurmarg-Badlapur Metro: मेट्रो लाईन 14चं काम सरकारच्या हातात, 38 किमी मार्गावर 15 स्थानकं; बदलापूर, महापे, कांजुरमार्ग जोडणार मार्गिका

    Kanjurmarg-Badlapur Metro: मेट्रो लाईन 14चं काम सरकारच्या हातात, 38 किमी मार्गावर 15 स्थानकं;  बदलापूर, महापे, कांजुरमार्ग जोडणार मार्गिका

    Mumbai Metro 14: कांजुरमार्ग-बदलापूर मेट्रोसाठी सार्वजनिक खासगी भागीदारी निविदा प्रक्रियेला प्रतिसाद मिळाला नाही. आता यासाठी सरकार कर्ज काढणार असून, मेट्रोचं सर्व काम आणि मालकी सरकारकडेच असणार आहे.

    म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: बदलापूर परिसरातील नागरिकांना शहरात येण्यासाठी जलद प्रवासाचा पर्याय म्हणून कांजुरमार्ग-बदलापूर मेट्रो-१४ मार्गिकेचे नियोजन करण्यात आले आहे. मेट्रो १४ च्या उभारणीसाठी सार्वजनिक खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावरील निविदा प्रक्रियेला प्रतिसाद मिळालेला नाही. यामुळे हा मेट्रो प्रकल्प आता नव्या पर्यायातून अर्थात वित्तीय संस्थांच्या मदतीने कर्ज घेऊन उभारण्याचा निर्णय मुंबई महानगर प्रदेश विकास (एमएमआरडीए) प्राधिकरणाने घेतला आहे.

    कशामुळे प्रतिसाद नाही?

    घाटकोपर-अंधेरी-वडाळा हा मेट्रो-एक मार्ग पीपीपी तत्त्वावर उभारण्यात आला आहे. यानंतर शहर आणि उपनगरातील मेट्रो १४ ही मार्गिका याच प्रकारे उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी मे २०२५ मध्ये एमएमआरडीएने स्वारस्याची अभिव्यक्तीसाठी (ईओआय) मागवल्या होत्या. मेट्रो-१४ साठी कोणत्याही विकासकाने तयारी दर्शवली नाही. विशेष म्हणजे, मेट्रो १४ प्रकल्पात पर्यावरण आणि वन खात्यांसंबंधित परवानग्यांची आवश्यकता आहे. ही क्लिष्ट आणि जटिल प्रक्रिया लक्षात घेता विकासकांनी याला प्रतिसाद दिलेला नाही.Maharashtra TimesMumbai Local Update: देशातील पहिली सलग 15-डब्यांची लोकल मुंबईमध्ये, 7500 प्रवासी क्षमता; विरार, डहाणू, वांद्रेसह कुठे धावणार?

    विकासकाने प्रतिसाद न दिल्याने आता सरकारकडून वित्तीय संस्थांकडून कर्ज घेण्यात येईल. मेट्रोची हाताळणी आणि मालकी सरकारकडे असणार आहे. मेट्रो मार्गिकेतील तिकीट विक्री आणि अन्य महसुलाच्या मदतीने कर्जाची परतफेड करण्यात येणार आहे. मेट्रो भाडे हा विषय राजकीयदृष्ट्या संवेदनशील आहे. यामुळे परताव्याबाबत हमी नसल्याने खासगी गुंतवणूकदार याकडे वळत नाहीत. मेट्रो प्रकल्प उभारणीतील खर्च वसूल करण्यासाठी दोन दशकांहून अधिक वेळ लागतो. त्यातुलनेत वार्षिक निश्चित उत्पन्न असलेल्या प्रकल्पांकडे खासगी गुंतवणूकदारांचा कल अधिक आहे, असे एमएमआरडीएतील अधिकाऱ्यांनी सांगितले.

    Mulund Metro : मुंबईमध्ये मेट्रोचा पिलरचा वरचा स्लॅब कोसळून भीषण अपघात, कार, रिक्षाचा चेंदामेंदा

    मेट्रो मार्ग असा…

    • मेट्रो मार्ग १४ हा बदलापूर, अंबरनाथ, निळजे, शिळफाटा, महापे, घणसोली आणि कांजुरमार्ग असा असणार आहे.
    • मार्गिकेसाठी ५.७ किमीचा भाग ठाणे खाडीखालून आणि ४.३८ किमीचा भाग हा पारसिक डोंगराच्या परिसरातून जाणार आहे.
    • प्रस्तावित १५ मेट्रो स्थानकांपैकी १३ उन्नत, एक भुयारी आणि एक जमिनीवर असणार आहे.
    • मार्गिकेसाठी बदलापूर येथील २० हेक्टर जागेत मेट्रो डेपो उभारण्याचे नियोजन आहे.
    • ३८ किमीच्या मेट्रो मार्गिकेसाठी १८ हजार कोटी रुपये अपेक्षित खर्च एमएमआरडीएने निश्चित केला आहे.
    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम, मटा ऑनलाईनमध्ये कन्सल्टंट पदावर कार्यरत आहे. प्रामुख्याने क्राइम, सिव्हिक आणि पॉलिटिक्स या बातम्या कव्हर करते. याआधी सहा महिने महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमध्ये कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून काम केले आहे. त्या काळात कॉलेज इव्हेंट्स, शैक्षणिक उपक्रम आणि सोशल मीडियावरील ट्रेंड्सवर बातम्या केल्या. मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून BMM मध्ये पदवी घेतल्यानंतर सध्या के.सी. महाविद्यालयात MA in Communication and Journalism करत आहे. इंटरनॅशनल घडामोडी आणि पॉप कल्चर हे विषय विशेष आवडीचे असून इंग्लिश आणि मराठी या दोन्ही भाषेत वाचन व लेखन करण्याची आवड आहे.… आणखी वाचा