Mumbai-Vijaydurg Ro Ro Ferry: मुंबई-विजयदुर्ग रो-रो सेवा लवकरच सुरु होण्याची शक्यता आहे. यामुळे मुंबई ते कोकण प्रवास सोपा होणार आहे आणि प्रवासात वेळही वाचणार आहे.
कधी सुरु होणार सेवा?
ऑगस्ट 2025मध्ये मुंबई ते विजयदुर्ग रो-रो फेरी सुरु करण्याची घोषणा केली होती. परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे हे रखडले होते. आता सर्व अडचणी दूर झाल्या असून ही सेवा एका महिन्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर सुरु करण्यात येणार आहे. यासाठी कंत्राटदार नेमण्याची प्रक्रिया सुरु झाली असून, निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. मार्च 2026पर्यंत हे काम पूर्ण करण्याचं उद्दिष्ट आहे. तसेच, काम होताच चाचणी फेऱ्या सुरु होतील. जर या फेऱ्या यशस्वी झाल्या तर एप्रिल 2026पर्यंत ही सेवा सुरु होण्याची शक्यता आहे. यामुळे उन्हाळ्यात मुंबईकरांना कोकणात जाण्यासाठी एक नवा पर्यायी मार्ग मिळणार आहे.
Mumbai Local Update: ICFकडून पहिली 15-डब्यांची लोकल मुंबईमध्ये, 7500 प्रवासी क्षमता; वांद्रे, विरार, डहाणूसह कुठे धावणार?
मुंबईतून गाडीने सिंधुदुर्गला पोहचण्यासाठी 10 ते 12 तास लागतात. त्यात सुट्टी आणि सणासुदीच्या काळात तर हा वेळ आणखी वाढतो. जलमार्गे प्रवास करताना निम्मा वेळ वाचणार आहे. तसेच वाहतूक कोंडीशिवाय सुलभ प्रवास होईल. मुंबईतील भाऊच्या धक्क्यावरून थेट कोकण किनारपट्टीवरील विजयदुर्ग अशी ही सेवा असेल. या मार्गावरील प्रवासी जेट्टीचं रुपांतर आता रो-रो जेट्टीमध्ये करण्यात आलं आहे. या रो-रो जेट्टीमुळे प्रवासी आपली स्वतःची चारचाकी व दुचाकी वाहनं घेऊन जाऊ शकतात. यासाठी सर्व सुविधा विजयदुर्ग आणि मुंबई टर्मिनलवर सुरु करण्यात आल्या आहेत.
Kanjurmarg-Badlapur Metro: मेट्रो लाईन 14चं काम सरकारच्या हातात, 38 किमी मार्गावर 15 स्थानकं; बदलापूर, महापे, कांजुरमार्ग जोडणार मार्गिका
कसे असतील तिकिट दर?
या सेवेसाठी तिकिट दर अद्याप निश्चित केले नाही आहेत. परंतु, प्राथमिक अंदाजानुसार साधारणपणे 800 ते 1200 रुपये प्रति प्रवासी तिकिट दर असू शकतात. शिवाय दुचाक्यांसाठी 1000 रुपये तर चारचाकीसाठी 4500 ते 6000 रुपये इतके तिकिट दर असू शकतात. गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्यांची संख्या मोठी असते. त्यामुळे ऑगस्टमध्ये गणेशोत्सवाच्या काही दिवसांपूर्वी ही सेवा सुरु होणार होती. पण तांत्रिक अडचणींमुळे हे काम त्यावेळी पूर्ण झाले नाही. तेव्हापासून नागरिक या सेवेच्या प्रतीक्षेत आहेत.
