Western Railway: पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात लवकरच देशातील पहिली सलग 15 डब्यांची लोकल रेक येणार आहे. ही पूर्णपणे स्वदेशी बनवटीची असून, या लोकलची 7500 प्रवासी क्षमता आहे. कुठून-कुठे धावणार?
भारतीय बनावटीची पहिली लोकल
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात लवकरच ही पहिली 15-डब्यांची लोकल येणार आहे. ही 15-डब्यांची EMU रेक पूर्णपणे स्वदेशी बनावटीची असून, चेन्नईमधील इंटिग्रल कोच फॅक्टरीने (ICF) तयार केली आहे. ही लोकल 18 फेब्रुवारीला चेन्नईवरून मुंबईच्या दिशेने रवाना झाली. लवकरच पश्चिम रेल्वे मार्गावर फेऱ्या सुरु करण्याचं उद्दिष्ट आहे. यानंतर हळू-हळू नव्या 12 नॉन-एसी लोकल मुंबईत सुरु करण्यात येणार आहेत. फेब्रुवारीअखेरिस दुसरी लोकल दाखल होण्याची शक्यता आहे. भारतीय बनावटीची अशीही देशातील सर्वात पहिलीच लोकल ट्रेन आहे. मुंबईमध्ये सर्वप्रथम ही लोकल धावणार आहे.
Thane News: ठाणे-कल्याणचा कायापालट! MMRDAकडून शहरांसाठी 48 हजार कोटी; दुहेरी बोगदा, तीन मेट्रो, कल्याण रिंग रोड… कसा होणार विकास?
मध्य रेल्वेवरही विस्तार होणार
पश्चिम रेल्वेनंतर मध्य रेल्वेवर ही या लोकल ट्रेन धावतील. त्यामुळे सीएसएमटी-कल्याण, विरार-डहाणूसह कर्जत-कसारा मार्गावरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. या मार्गांवर सर्वाधिक गर्दी होते. या 15 डब्यांच्या लोकलमुळे ट्रेनची प्रवासी क्षमता वाढणार असून, गर्दीवर नियंत्रण ठेवता येणार आहे. शिवाय, ICF लवकरच मुंबई उपनगरिय रेल्वेसाठी दोन स्वयंचलित दरवाजे असलेल्या नॉन-एसी लोकलसुद्धा तयार करणार आहे. या नॉन-एसी लोकल लवकरच मध्य आणि पश्चिम रेल्वेवर सुरु करण्यात येणार आहेत.
दरम्यान, रेल्वे मंत्रालयाकडून मुंबईसाठी नव्या 12 डब्यांच्या 238 लोकल सुरु करण्याचाही आदेश दिला आहे. यामुळे मुंबई लोकलच्या फेऱ्यांमध्ये मोठी वाढ होणार आहे. सध्या 15 डब्यांच्या लोकलसाठी काही स्थानकांची लांबी अपुरी पडते आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेच्या विलेपार्ले, सांताकक्रूझ, खार रोड आणि वांद्रे स्थानकांवर फलाटांची लांब वाढवण्यात येत आहे. ही कामे पूर्ण होताच 15 डब्यांच्या लोकल फेऱ्या सुरु होण्याची शक्यता आहे.
