नागपूरच्या उच्चभ्रू हिलटॉप परिसरात माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. अवघ्या आठ महिन्यांच्या एका चिमुकलीला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकून देण्यात आले, जिथे…
पंचनामा
पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह पुढील वैद्यकीय तपासणीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) पाठवला आहे. प्राथमिक तपासात रात्रीच्या अंधारात कोणीतरी अज्ञात व्यक्तीने चिमुकलीला येथे आणून टाकल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे.
सीसीटीव्ही फुटेजची तपासणी
अंबाझरी पोलिसांनी घटनेची गंभीर दखल घेत परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. तसेच गेल्या काही महिन्यांमध्ये परिसरात झालेल्या बाळंतपणाची माहिती गोळा करण्यात येत आहे. अनैतिक संबंधांमधून या चिमुकलीचा जन्म झाला असण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवली जात असली, तरी तपास पूर्ण होईपर्यंत कोणताही निष्कर्ष काढणे घाईचे ठरणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
Rohit Pawar: पायलटचा वापर, अजितदादांचं विमान मुद्दाम आदळलं अन् मोठा स्फोट घडवला; रोहित पवारांच्या नव्या दाव्याने खळबळ!
कठोर कारवाईची मागणी करावी
दरम्यान, ही घटना समोर आल्यानंतर परिसरात संताप आणि हळहळ व्यक्त केली जात आहे. आई-मुलीच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी ही घटना असून नऊ महिने पोटात वाढवलेला जीव अशा निर्दयी पद्धतीने कचऱ्यात फेकला जाणे ही अत्यंत वेदनादायी बाब आहे, शहरात यापूर्वीही नवजात बालकांना टाकून देण्याच्या घटना समोर आल्या आहेत. मात्र आठ महिन्यांच्या मुलीला अशा अवस्थेत आढळल्याने नागरिकांमध्ये भीती आणि असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. या प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर अटक करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.
पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, या घटनेबाबत कोणतीही माहिती असल्यास तात्काळ अंबाझरी पोलिसांशी संपर्क साधावा. तपास सुरू असून दोषींना कायद्याच्या कचाट्यात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
