• Sun. Jun 7th, 2026
    Beed Crime: मैत्रीच्या नात्यावर कलंक! बाप दुचाकी चालवत होता अन् मागचा मित्र नराधम निघाला; सातवीतल्या मुलीसोबत भयानक केलं….

    बीडच्या केज तालुक्यात मैत्रीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. १३ वर्षांच्या मुलीला दवाखान्यात नेताना वडिलांच्या मित्रानेच तिच्याशी अश्लील वर्तन केले.

    आजारी मुलीला दवाखान्यात नेताना पित्याच्या मित्रानेच केला विनयभंग.(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    सुकेशनी नाईकवाडे,बीड : सर्वात श्रेष्ठ नाते म्हणून मैत्रीच्या नात्याला पाहिले जाते, मात्र बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातून समोर येतं आहे. मैत्रीच्या नात्याला काळिमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना. ही गंभीर घटना समोर आल्याने जिल्ह्यात संतापाची लाट पसरली आहे. आपल्या मित्राच्या अल्पवयीन मुलीला औषधोपचारासाठी दवाखान्यात मोटारसायकलवर घेऊन जात असताना मित्रानेच मुलीशी अश्लील वर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी युसूफवडगाव पोलिस ठाण्यात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले आहे.

    या बाबत मिळालेल्या अधिकच्या माहितीनुसार, बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील युसूफवडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील सातवीत शिकणाऱ्या १३ वर्षीय मुलीचा शनिवारी रात्री अचानक कान दुखू लागला. मुलीच्या वडिलांनी रात्री १० च्या सुमारास आपल्या दुचाकीवर मुलीला घेऊन दवाखान्यात जाण्याचे ठरवले. यावेळी त्यांनी सोबत मदत म्हणून आपला मित्र किशोर लक्ष्मण कांबळे (वय ३२) यालाही घेतले. दोघांच्यामध्ये मुलगी दुचाकीवर बसवण्यात आली होती. धनेगाव येथील डॉक्टरांकडे उपचार करून परत येत असताना, आरोपीने त्या अल्यवयीन मुलीसोबत अश्लील चाळे करत असभ्य वर्तन केले.

    घरी परतल्यानंतर पीडित मुलीने घडलेला सर्व प्रकार आपल्या पालकांना सांगितला. मुलीची आपबिती ऐकून पायाखालची जमीन सरकली. ज्याच्यावर एवढा विश्वास दाखवला त्यानेच असा धोका दिला .हादरलेल्या वडिलांनी तातडीने पोलिसांत धाव घेतली आणि झालेला सर्व प्रकार युसूफ वडगाव येथील पोलिसांना सांगितला असल्याचे फिर्यादीत सांगण्यात आले आहे.

    Maharashtra TimesSatara Shiv jayanti : साताऱ्यात शिवजयंती कार्यक्रमावरून वाद; अघोरी नृत्याच्या आयोजनावर अंनिसची हरकत

    पीडित अल्पवयीन मुलीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून आरोपी किशोर कांबळे विरुद्ध रविवारी युसूफवडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी कसलाही विलंब न करता आरोपीला त्याच्या गावातून बेड्या ठोकल्या. पिंक पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक प्रकाश शेळके यांनी आरोपीला केज न्यायालयात हजर केले.

    न्यायालयाने आरोपीला एक दिवसाचा पी सी आर दिला असून त्याची कसून चौकशी केली जात असल्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शेडगे यांनी म्हटले आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे, हे एक पत्रकार आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून बी.ए व एम.ए. पत्रकारितेचं पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉलेज जीवनातच ‘दैनिक दिव्य मराठी’मध्ये पत्रकारितेचं प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलं आहे. दोन वर्षे ‘लोकसत्ता डॉट कॉम’साठी ‘फोटोगॅलरी व वेबस्टोरी’ या विभागात काम केलं आहे. ते ६ ऑक्टोबर २०२५ पासून ‘महाराष्ट्र टाईम्स’ ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयांच्या लिखाणात आवड आहे. याशिवाय काव्य लेखन, गीत लेखन आणि सादरीकरणातही स्वारस्य आहे. फोटोग्राफी, फोटो, व्हिडिओ संपादनातही खास रस आहे… आणखी वाचा