• Sat. Mar 7th, 2026

    Mumbai-Pune Expressway: ‘पुणे-मुंबई एक्सप्रेसवे’वर कोंडीतही टोल वसुली, MSRDC करणार पूर्ण रक्कम परत; कधी-कशी मिळणार?

    Mumbai-Pune Expressway: ‘पुणे-मुंबई एक्सप्रेसवे’वर कोंडीतही टोल वसुली, MSRDC करणार पूर्ण रक्कम परत; कधी-कशी मिळणार?

    Pune-Mumbai Expressway Toll: पुणे-मुंबई एक्सप्रेसवे वर टँकर पलटी झाल्यामुळे 3 फेब्रुवारीला 32 तासांसाठी वाहतूक कोंडी झाली होती. यावेळी अनेक वाहन चालकांकडून टोल वसूल करण्यात आला होता. तो परत करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.

    म.टा. प्रतिनिधी, पुणे: पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर तीन फेब्रुवारी झालेल्या भीषण वाहतूक कोंडीनंतरही वाहनचालकांकडून टोल आकारण्यात आल्याप्रकरणी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) संबंधित ठेकेदाराला नोटीस बजावली असून, टोल वसुली केलेल्या वाहनचालकांना टोलची रक्कम परत करण्यासाठीची प्रक्रिया सुरू करण्याचा आदेश दिला आहे.

    फास्टॅगद्वारे टोल वसुली

    पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर तीन फेब्रुवारीला सायंकाळी साडेचारच्या सुमारास खंडाळा घाटातील अदोशी बोगद्याजवळ मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर प्रोपिलीन वायू वाहून नेणारा टँकर उलटला. या अपघातानंतर संपूर्ण मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. अपघातामुळे वाहतूक कोंडी सुमारे ५० किलोमीटरपर्यंत झाली होती. हजारो वाहनचालक आणि प्रवासी महामार्गावर तासन्‌तास अडकून पडले होते. या काळात फास्टॅगद्वारे वाहनचालकांकडून वसूल झालेल्या टोलची परतफेड करण्याची प्रक्रिया महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) सुरू केली आहे. टोल संकलन करणाऱ्या आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चरकडून फास्टॅग कपातीचा संपूर्ण डेटा मागविण्यात आला असून, कोणत्या वाहनचालकांकडून किती रक्कम वसूल झाली, याची माहिती तपासली जात आहे.Maharashtra TimesMumbai Water Metro: डिसेंबरपासून मुंबईत धावणार ‘जल मेट्रो’, मंत्री नितेश राणेंचा गेमचेंजर प्लॅन; नरिमन पॉइंट, वर्सोवा… कसे असतील 8 मार्ग?

    वाहतूक बंद असतानाही काही वाहनचालकांच्या फास्टॅग खात्यातून टोल कपात झाल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या. याबाबत ‘एमएसआरडीसी’ने आयआरबीकडे माहिती मागवली आहे. अडथळ्याच्या काळात टोल वसुली थांबविण्याचे निर्देश दिले होते. तथापि, बॅरिअर्स बंद असतानाही काही व्यवहार झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

    ‘पुणे- मुंबई एक्सप्रेसवेवर 3 फेब्रुवारी रोजी झालेल्या भीषण वाहतूक कोंडीनंतर वसूल करण्यात आलेला टोल प्रवाशांना परत करण्याबाबत अद्याप अंतिम निर्णय घेतला नाही. मात्र, तो परत करण्याबाबत सकार्तमक विचार सुरू आहे,’ अशी माहिती एमएसआरडीसीचे कार्यकारी अभियंता राकेश सोनवणे यांनी दिली आहे.

    Maharashtra TimesWestern Railways: मुंबईत रेल्वे स्थानकांचा कायापालट! नवे पूल, सरकते जिने आणि आधुनिक सुविधा; मुंबई सेंट्रलसह दोन स्थानकांचा समावेश

    पाणीपुरवठ्यावरून पालिकेचे प्रत्युत्तर

    पुणे महापालिकेचे जलसंपदा विभागाकडे तब्बल ४११ कोटी रुपये अतिरिक्त आहेत, असा दावा महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केला आहे. जलसंपदा विभागाने ९३३ कोटी रुपयांची थकबाकी भरण्याची नोटीस पाठवून पाणीपुरवठा खंडित करण्याची धमकी दिल्यानंतर महापालिकेने हे प्रत्युत्तर दिले आहे. महापालिकेने जलसंपदा विभागाच्या मागणीला न्यायालयात आव्हान दिले असून, हा वाद निरर्थक असल्याचे म्हटले आहे.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम, मटा ऑनलाईनमध्ये कन्सल्टंट पदावर कार्यरत आहे. प्रामुख्याने क्राइम, सिव्हिक आणि पॉलिटिक्स या बातम्या कव्हर करते. याआधी सहा महिने महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमध्ये कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून काम केले आहे. त्या काळात कॉलेज इव्हेंट्स, शैक्षणिक उपक्रम आणि सोशल मीडियावरील ट्रेंड्सवर बातम्या केल्या. मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून BMM मध्ये पदवी घेतल्यानंतर सध्या के.सी. महाविद्यालयात MA in Communication and Journalism करत आहे. इंटरनॅशनल घडामोडी आणि पॉप कल्चर हे विषय विशेष आवडीचे असून इंग्लिश आणि मराठी या दोन्ही भाषेत वाचन व लेखन करण्याची आवड आहे.… आणखी वाचा