• Fri. Sep 18th, 2026
२५ लाख घेतल्याचा आरोप सिद्ध करण्याचं सुनील शेळकेंना आव्हान; भेगडेंनी थेट इशाराही दिला

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार सुनील शेळके यांनी मावळमधील भाजपच्या नेत्यांवर गंभीर आरोप केले.ईव्हीएम हॅक करून भाजप उमेदवारांना विजयी करण्यासाठी प्रत्येकी २५ लाख रुपये घेतल्याचा आरोप शेळकेंनी केला.या आरोपांवर आता भाजपने पत्रकार परिषद घेत जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. आरोप पुराव्यानिशी सिद्ध करावेत,अन्यथा अब्रूनुकसानीचा दावा दाखल केला जाईल असं भाजप नेते म्हणाले.बिनबुडाचे आणि राजकीय हेतूने केलेले आरोप आम्ही सहन करणार नाही, असा इशाराही यावेळी देण्यात आला. सुनील शेळकेंना खासदार संजय राऊत यांचा वाण नाही, पण गुण मात्र लागले आहेत, अशी टोलेबाजीही करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed