• Mon. Mar 16th, 2026

    ST Bus: स्वारगेट बस स्थानाकत महिलेवर अत्याचार, एका वर्षानंतर महामंडळाला आली जाग; आता 7000 सीसीटीव्ही बसवणार; कुठे?

    ST Bus: स्वारगेट बस स्थानाकत महिलेवर अत्याचार, एका वर्षानंतर महामंडळाला आली जाग; आता 7000 सीसीटीव्ही बसवणार; कुठे?

    ST Bus CCTV Camera: एसटी महामंडळाने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी बस स्थानकात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे मुंबई, ठाण्यासह 64 विभागात एकूण 7000 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म.टा. खास प्रतिनिधी, मुंबई: एसटी महामंडळाच्या प्रवाशांना सीसीटीव्हीचे सुरक्षा कवच लाभणार आहे. महामंडळाने नवीन सीसीटीव्ही प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेतला आहे. सीसीटीव्हींच्या निगराणीसाठी मुंबई सेंट्रल मुख्यालयात नियंत्रण कक्ष उभारण्यात येणार आहे. येत्या वर्षभरात एसटी स्थानकात सात हजार सीसीटीव्हींचे जाळे कार्यान्वित होणार आहे.

    64 ठिकाणी बसवणीर कॅमेरे

    गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात पुण्यातील स्वारगेट स्थानकात शिवशाही बसमध्ये एका महिलेवर अत्याचाराची घटना घडली होती. घटनेनंतर प्रवाशांच्या विशेषतः महिला सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित झाला होता. घटनेच्या वर्षभरानंतर प्रवासी सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही सुरक्षा प्रकल्पाला गती मिळाली आहे. प्रकल्पाच्या प्राथमिक टप्प्यात मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर विभागातील ६४ महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही प्रणाली बसविण्यात आली आहे. उर्वरित २७ विभागांसह कार्यशाळा आणि कार्यालय परिसरात येत्या महिन्याभरात काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे.Maharashtra TimesWestern Railways: मुंबईत रेल्वे स्थानकांचा कायापालट! नवे पूल, सरकते जिने आणि आधुनिक सुविधा; मुंबई सेंट्रलसह दोन स्थानकांचा समावेश

    एसटी स्थानकांसह आगार, विभागीय कार्यशाळा, मध्यवर्ती कार्यशाळा, विभागीय कार्यालये तसेच मध्यवर्ती प्रशिक्षण संस्था भोसरी यांसारख्या संवेदनशील ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करण्यात येत आहे. राज्यातील सर्व सीसीटीव्हींच्या निगराणीसाठी मुंबई सेंट्रल येथील महाराष्ट्र वाहतूक भवन येथील मुख्यालयात मध्यवर्ती नियंत्रण कक्ष उभारण्यात आले आहे. कक्षाची वापरकर्ता स्वीकृती चाचणी यशस्वी झाली आहे. नियंत्रण कक्षातून राज्यातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर एकाच ठिकाणी लक्ष ठेवणे शक्य होईल, अशी माहिती महामंडळाने दिली.

    एसटी महामंडळ सीसीटीव्ही प्रकल्प

    ठिकाणे – ६३३
    सीसीटीव्ही संख्या – ७०३५
    बसवणारी यंत्रणा – टेलिकम्युनिकेशन कन्सल्टंट इंडिया लिमिटेड (टीसीआयएल)
    प्रकल्प पूर्ती कालावधी -एक वर्ष
    देखरेख – मुंबई सेंट्रल येथील मध्यवर्ती नियंत्रण कक्ष
    खर्च – १११ कोटी रुपये
    सीसीटीव्ही प्रकल्प – मुंबई, ठाणे, पालघर, रायगडमधील ६४ ठिकाणी
    उर्वरित विभाग, कार्यशाळा, कार्यालय – २७

    Maharashtra TimesMumbai Water Metro: डिसेंबरपासून मुंबईत धावणार ‘जल मेट्रो’, मंत्री नितेश राणेंचा गेमचेंजर प्लॅन; नरिमन पॉइंट, वर्सोवा… कसे असतील 8 मार्ग?

    ‘नवीन सीसीटीव्ही प्रकल्प हा केवळ कॅमेरे बसवण्याचा उपक्रम नसून एसटीच्या प्रवासी सुरक्षेला डिजिटल कवच देणारा ऐतिहासिक टप्पा ठरणार आहे. स्थानक आणि अन्य एसटी परिसर सीसीटीव्हीच्या कक्षेत आल्याने कोणत्याही अनुचित घटनांवर त्वरित नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे’, असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम, मटा ऑनलाईनमध्ये कन्सल्टंट पदावर कार्यरत आहे. प्रामुख्याने क्राइम, सिव्हिक आणि पॉलिटिक्स या बातम्या कव्हर करते. याआधी सहा महिने महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमध्ये कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून काम केले आहे. त्या काळात कॉलेज इव्हेंट्स, शैक्षणिक उपक्रम आणि सोशल मीडियावरील ट्रेंड्सवर बातम्या केल्या. मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून BMM मध्ये पदवी घेतल्यानंतर सध्या के.सी. महाविद्यालयात MA in Communication and Journalism करत आहे. इंटरनॅशनल घडामोडी आणि पॉप कल्चर हे विषय विशेष आवडीचे असून इंग्लिश आणि मराठी या दोन्ही भाषेत वाचन व लेखन करण्याची आवड आहे.… आणखी वाचा