• Sun. Mar 8th, 2026
    नाशिकमध्ये रंगणार चौथे विश्व मराठी संमेलन; उदय सामंत यांची घोषणा, कधी होणार सुरु?

    म. टा. प्रतिनिधी, नाशिक: निवडणुकांमुळे पुढे ढकलण्यात आलेल्या चौथ्या विश्व मराठी संमेलनाच्या तारखांची अखेर घोषणा झाली असून, नाशिकमध्ये येत्या २६ फेब्रुवारी ते १ मार्चदरम्यान चार दिवस हे संमेलन मराठी भाषा विभागाच्या वतीने आयोजित केले जाणार आहे. मराठी भाषा तथा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी रविवारी (दि. १५) ही घोषणा केली.

    गेल्या डिसेंबरमध्ये नियोजित असलेले हे संमेलन निवडणूक आचारसंहितेमुळे पुढे ढकलण्यात आले होते. आता कवी कुसुमाग्रजांचा जन्मदिन तथा मराठी भाषा दिन व आगामी कुंभमेळ्याचे औचित्य साधून मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या आवारात हे संमेलन होत असून, त्यात चार दिवस भरगच्च कार्यक्रम रंगणार आहेत. विविध भागांतील बोलीभाषांवर स्वतंत्र सत्रे असतील.

    Nashik Accident: मद्यधुंद रुग्णवाहिका चालकाचा प्रताप; समोरुन येणाऱ्या कारला ठोकलं, दोनजण गंभीर जखमी
    मंत्री सामंत यांनी रविवारी दिवसभर याबाबत नाशिकमधील साहित्यिक, लेखकांशी चर्चा केली. नियोजन आढावा बैठक घेतली व त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन तारखांची घोषणा केली. संमेलनात २६ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेआठ ते रात्रीपर्यंत मराठी बोलीभाषा उत्सव साजरा केला जाणार असून, त्यात कोकण, विदर्भ, मराठवाडा आदी भागांतील बोलीभाषांवर स्वतंत्र सत्रे असतील. कुसुमाग्रजांच्या निवासस्थानापासून २७ रोजी सकाळी ग्रंथ दिंडी काढली जाईल. सायंकाळी पाचला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत संमेलनाचे उद्घाटन प्रदर्शन, होईल. त्यानंतर मराठी भाषा विभागाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या ३५ पुरस्कारांचे वितरण होणार आहे.

    Maharashtra Timesराज्यातील ग्रामपंचायती शुक्रवारी बंद; अखिल भारतीय सरपंच परिषदेचा मोठा निर्णय, काय कारण?
    यंदा साहित्यभूषण, कलारत्नसह नाशिक विशेष पुरस्कार दिले जाणार असून, त्यांची घोषणा मंगळवारी (दि. १७) मुंबईत केली जाणार आहे. संमेलनात व्याख्याने, परिसंवाद, कविसंमेलने, लोककला सादरीकरण, नाट्यप्रयोग, कथाकथन, पुस्तक मुलाखती, कलाप्रदर्शने आदी कार्यक्रम होणार असून, दररोज रात्री विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. त्यात राहुल देशपांडे यांचे गायन, ‘अभिजात भाषा, मराठी भाषा’, ‘फोक आख्यान’ व ‘आमनेसामने’ नाटक यांचा समावेश आहे. संमेलनाच्या मुख्य मंडपाला कुसुमाग्रजांचे नाव दिले जाणार आहे.

    संमेलनाला परदेशातून पाचशे वक्ते, उद्योजक उपस्थित राहणार असल्याचे सामंत यांनी सांगितले. तयारीसाठी दहा दिवसच उरल्याने मराठी भाषा विभागाचे अधिकारी नाशिकमध्ये तळ ठोकणार असल्याचेही ते म्हणाले. या वेळी डॉ. श्यामकांत देवरे, डॉ. नामदेव भोसले, नितीन डोंगरे, ऊर्मिला धादवड, डॉ. प्रदीप ढवळ, ‘मविप्र’ संस्थेचे सरचिटणीस अॅड. नितीन ठाकरे, सभापती बाळासाहेब क्षीरसागर आदी उपस्थित होते.

    Maharashtra TimesNashik Crime: परीक्षेला जाताना विद्यार्थिनीचा विनयभंग; नाशकात रोडरोमियोचा संतापजनक प्रकार, भररस्त्यात छेडछाड
    मराठी स्वाक्षरीने कार्यालयाचे उद्घाटन
    मविप्र समाज संस्थेच्या आवारात विश्व मराठी संमेलनाचे कार्यालय सुरू करण्यात आले आहे. सामंत यांनी फलकावर मराठीत स्वाक्षरी करून व संमेलनाच्या संकेतस्थळाची कळ दाबून या कार्यालयाचे उद्घाटन केले.

    यंदाचे संमेलन राजकारणविरहित
    विश्व मराठी संमेलन मुंबई परिसरातच करण्याची मानसिकता मराठी भाषा विभागाची होती. आपण मंत्री झाल्यावर हे संमेलन मुंबईबाहेर काढले. गेल्या वर्षी ते पुण्यात झाले. पुढच्या वर्षी कदाचित ते परदेशात होईल, असे सामंत म्हणाले. यंदाचे संमेलन राजकारणविरहित व नाशिकच्या संस्कृतीला साजेसे होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये ३ वर्षांपासून कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे.या आधी सकाळ मिडियामध्ये २ वर्ष कामाचा अनुभव आहे. चालू घडामोडी, गुन्हेगारी, राजकीय विषयांच्या बातम्यांत विशेष आवड.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *