Harshwardhan Sapkal On Pune BJP-Congress Rada: फडणवीसांना ‘ध’चा ‘मा’ करून महाराष्ट्रात दंगली घडवायच्या आहेत, असा आरोप हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.
‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी माझ्या विधानातून हिंदू-मुस्लिम वाद निर्माण करण्याची संधी शोधली. फडणवीस यांची तुलना मी औरंगजेबाशी केली, त्यांना गजनी म्हटले, त्यावेळी ते म्हणाले होते, ‘कोण हर्षवर्धन सपकाळ ? मी त्यांना ओळखत नाही.’ पण काल मात्र त्यांनी माझ्या नावाने गरळ ओकली,’ अशी टीका हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.
Jayant Patil: ‘सुनेत्रा पवारांच्या मदतीला जाऊ पण आता विलीनीकरणाची चर्चा नको’; जयंत पाटलांचं मोठं वक्तव्य, म्हणाले, ‘आमचा पक्ष स्वतंत्र…’
‘नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत भाजपचे बॅनर व पोस्टरवर टिपू सुलतानचे फोटो होते. भाजपने राज्यात अमरावती, चंद्रपूरसह २१ ठिकाणी धर्मांध एमआयएमशी युती केली आहे. हे भाजपाला चालते, सावरकरांनी महाराजांबद्दल जे विकृत लिखाण केले आहे, तसेच भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल जी वक्तव्ये केली, त्याबद्दल भाजप सावरकर व कोश्यारी यांचे पुतळे जाळणार का?’ असा प्रश्न सपकाळ यांनी केला.
Gautami Patil : ‘अजित दादांनी नकळत का होईना मला सपोर्ट केला’, गौतमी पाटील नेमकं काय म्हणाली?
‘दंगलखोरांना अटक करावी’
‘भाजप माझ्या वक्तव्याला हिंदू-मुस्लिम रंग देऊन खतपाणी घालत आहे. पुण्यातील भाजपचे गुंड पुणे काँग्रेसच्या कार्यालयावर चाल करून आले व पोलिसांच्या उपस्थितीत दगडफेक करत काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांसह पत्रकार भगिनींवर प्राणघातक हल्ला केला. पुणे पोलिसांनी दंगलखोर भाजप गुंडाना चिथावणी देणाऱ्या धीरज घाटे व महापौर मंजुषा नागपुरे यांच्यासह दंगखोरांवर तत्काळ गुन्हे दाखल करून त्यांना अटक करावी,’ अशी मागणी सपकाळ यांनी केली
