Breaking News Live: रविवारी रात्री भारताने टी-२० वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानवर ६१ धावांनी दणदणीत विजय मिळवला. या विजयासह भारतीय संघाने ‘सुपर एट’ फेरीत प्रवेश केला. कोलंबोतील प्रेमदासा स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात ईशान किशनच्या ७७ धावांच्या खेळीमुळे भारताने आव्हानात्मक धावसंख्या उभारली. दरम्यान, वडाळा-कासारवडवली मेट्रो-४ मार्गिकेच्या कठड्याचा भाग शनिवारी मुलुंड येथे लालबहादूर शास्त्री मार्गावर कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर ‘एमएमआरडीए’ने सुरक्षा तपासणी मोहीम राबवली आहे. त्यानुसार, ‘एमएमआरडीए’ने या मार्गिकेची तपासणी करण्यासाठी दोन पथके नेमली आहेत. या पथकांनी रविवारपासून या मार्गिकेवरील खांब, तुळया, बांधकाम आदींची तपासणी सुरू केली आहे.
राज्यातील सर्व महत्त्वाच्या बातम्या पाहा एकाच ठिकाणी
