Nashik Woman Death: पतीला वाचविताना पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सिन्नर तालुक्यात घडली. घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
नेमकं काय घडलं?
दीपक खाडे (वय ४२) हे सकाळी आठच्या सुमारास शेतातील विहिरीवर पिकांना पाणी देण्यासाठी गेले होते. वीजपंप सुरू करण्यासाठी त्यांनी विजेच्या पेटीजवळील बटण दाबताच त्यांना तीव्र विजेचा धक्का बसला. क्षणाचाही विलंब न करता छाया यांनी धावत जाऊन पतीला जोरात ढकलले. त्यामुळे ते दूर फेकले गेले आणि मोठ्या संकटातून बचावले. पण छाया स्वतः विजेच्या धक्क्याच्या विळख्यात सापडल्या.
गंभीर अवस्थेत त्यांना तातडीने सिन्नर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. या घटनेची पोलिसांत आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद झाली असून, पुढील तपास सुरू आहे. गावकऱ्यांच्या मते, छाया कुटुंबवत्सल होत्या. या हृदयद्रावक घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.
Nashik News : मित्राची अनामिक ओढ, आईची नजर चुकवून नाशकातील तीन अल्पवयीन मैत्रिणी भेटीला, रात्री घराजवळ पेरुच्या बागेतच…
मुलगी बारावीत
छाया यांच्या पश्चात पती, सासू-सासरे, मुलगी व मुलगा असा परिवार आहे. त्यांची मुलगी १२ वी इयत्तेत असून, सध्या तिची परीक्षा सुरू असतानाच आईच्या मृत्यूच्या घटनेने तिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
Nashik Crime: विवाहित पूजाचा धक्कादायक मृत्यू; पतीच्या अनैतिक संबंधांचा संशय आल्यानंतर काय घडलं? आता प्रेयसीसह…
तर दुसऱ्या एका घटनेत, जळगाव शहरात शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास कालंका माता चौफुलीजवळ एका भीषण अपघाताची घटना घडली. दिवसभर घाम गाळून कुटुंबासाठी भाजीपाला घेऊन घराकडे परतणाऱ्या प्रभाकर पाटील (वय ५५, रा. तेली चौक) या हातमजुराचा डंपरच्या चाकाखाली चिरडून मृत्यू झाला. या घटनेमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी डंपरची तोडफोड करून महामार्गावर रास्तारोको केल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. प्रभाकर पाटील हे मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करत असत. शुक्रवारी दिवसभराचे काम संपवून त्यांनी कुटुंबासाठी भाजीपाला खरेदी केला आणि ते पायी घराकडे निघाले होते. मात्र, कालंका माता चौफुलीजवळ भरधाव डंपरने त्यांना जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की पाटील यांचा जागीच मृत्यू झाला.
