• Fri. Mar 6th, 2026
    “आम्हा कोणाकोणाला एक-एक कोटी मिळाले? संदीप देशपांडे नावं सांगा, राजीनामा टाकतो”; ठाकरेसेनेच्या नेत्याचा पलटवार

    Chandrapur News : शिवसेनेच्या (उबाठा) नगरसेवकांना एक-एक कोटी रुपये देण्यात आले. शिवाय त्यांना वेगळ्या ऑफर दिल्या आहेत, असा आरोप मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केला होता.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    चंद्रपूर : ‘आम्हाला कुणी पैसे दिले आणि कुणी घेतले त्यांची नावे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी जाहीर करावे. आम्हाला कुणी पैसे देऊन विकत घेतले असेल, तर माझ्यासह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सर्व नगरसेवक राजीनामा देतील’ असे जाहीर आव्हान ठाकरेसेनेचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष संदीप गिऱ्हे यांनी गुरुवारी दिले.

    चंद्रपुरात मविआत फूट

    चंद्रपुरात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या सहाय्याने भारतीय जनता पक्षाचा महापौर बसला, तर महाविकास आघाडीतील काँग्रेस मात्र अधिक जागा मिळवूनही सत्तेपासून वंचित राहिली. त्या पार्श्वभूमीवर ‘चंद्रपूर महापालिकेत शिवसेनेच्या (उबाठा) नगरसेवकांना एक-एक कोटी रुपये देण्यात आले. शिवाय त्यांना वेगळ्या ऑफर दिल्या आहेत’ असा आरोप मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केला होता. यावर प्रत्युत्तर देताना गिऱ्हे यांनी हे आव्हान दिले.
    Maharashtra TimesAir India Crash : पायलटने मुद्दाम विमान पाडलं? इंधन स्वीच जाणुनबुजून बंद केलं, तपास अहवालात धक्कादायक निष्कर्ष असल्याचा दावा

    चंद्रपुरात ठाकरेंची भूमिका चुकीचीच

    दुसरीकडे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही उबाठा पक्षावर शरसंधान साधले. ‘चंद्रपुरात शिवसेना (उबाठा) पक्षाने भाजपला पाठिंबा देऊन आघाडीचा धर्म पाळला नाही. काँग्रेसने मात्र परभणी महापौरपदाच्या निवडणुकीत आघाडीचा धर्म पाळला आहे. परभणीमध्ये शिवसेना (उबाठा) पक्षाचा महापौर व काँग्रेसचा उपमहापौर झाला आहे. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी, इंडिया आघाडी, मविआ, लोकशाही; तसेच संविधानासाठी काँग्रेसच्या सर्व १२ नगरसेवकांनी शिवसेना (उबाठा)ला मतदान केले,’ असे मत हर्षवर्धन सपकाळ यांनी गुरुवारी व्यक्त केले.
    Maharashtra TimesParbhani Mayor : परभणीच्या महापौरपदी ठाकरेसेनेचे इकबाल सय्यद, काँग्रेसच्या साथीने सत्ता, भाजप उमेदवाराचा पराभव
    सपकाळ पुढे म्हणाले की, ‘चंद्रपूर महानगरपालिकेत शिवसेना उबाठाने जी भूमिका घेतली त्याची सल असण्याची अथवा बदला घेण्याची भूमिका व संस्कृती काँग्रेसची नाही. चंद्रपूरसंदर्भात खासदार संजय राऊत यांच्याशी काँग्रेसच्या नेत्यांनी चर्चा केली होती. काँग्रेसचे नेते शिवसेना (उबाठा) पक्षाशी सातत्याने संपर्कात होते असे असताना राऊत व त्यांच्या पक्षातील लोकांनी जी वक्तव्ये केली ती चुकीची असून, आघाडी धर्माला शोभणारी नाहीत. वंचित बहुजन आघाडी हा काँग्रेसचा मित्र पक्ष आहे. त्यांचे दोन नगरसेवक गैरहजर राहिले. त्यांना पक्षाने बडतर्फ केले; तसेच शहराध्यक्षांवरही कारवाई केली; पण शिवसेना उबाठा पक्षाने कोणतीच कारवाई केली नाही. हे काँग्रेस पक्ष कदापि सहन करणार नाही’.

    Sanjay Jadhav | ‘भाजपने आमच्याशी हिंदूत्त्वाशी गप्पा मारू नये’, उबाठा खासदार संजय जाधव भडकले

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश सतीश बेंद्रे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक पदावर कार्यरत आहेत. गेल्या तीन वर्षांपासून ते मटासोबत काम करत आहेत. राजकीय, गुन्हेगारी आणि मनोरंजन या विषयातील बातम्यांमध्ये त्यांचा विशेष हातखंडा आहे. ब्रेकिंग न्यूजसोबतच निवडणूक विषयक विश्लेषण करण्यात त्यांना अधिक रस आहे. त्यांनी झेविअर्स कॉलेजमधून मास कम्युनिकेशनचे पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. आतापर्यंत एबीपी माझा, टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 12 वर्षांहून अधिक काळचा अनुभव त्यांना आहे… आणखी वाचा