छत्रपती संभाजीनगर
छत्रपती संभाजीनगरच्या हर्सूल परिसरात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. घराचा आर्थिक डोलारा पेलण्यासाठी वडिलांना भाजी विक्रीत मदत करणाऱ्या सतरा वर्षीय तरुणाचा भीषण रस्ते अपघातात मृत्यू झाला. गुरुवारी 12 फेब्रुवारी रात्री हा अपघात झाला असून, धडक देणाऱ्या वाहनचालकाने घटनास्थळावरून पलायन केले आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली आहे.
कुटुंबाचा आधार हरपला
स्थानिक नागरिकांनी जखमी उबेदला पाहताच त्याला तातडीने त्याला घाटी रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात जाताच डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले. त्यानंतर शुक्रवारी 13 फेब्रुवारीला उबेदचं शवविच्छेदन करण्यात आलं. त्यात त्याचा मृत्यू अपघातामुळेच झाला असल्याचं स्पष्ट झालं. शुक्रवारी शवविच्छेदनानंतर त्याचा मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. उबेदच्या पश्चात त्याचे आई-वडील, भाऊ आणि बहीण असा परिवार असून, एका मेहनती तरुणाचा असा अंत झाल्याने हर्सूल परिसरात दुःख व्यक्त केले जात आहे.
अजित पवारांच्या अपघातावरून रोहित पवारांचे गंभीर प्रश्न, तपासाला दिशा मिळणार?
दाम्पत्याला लुटणारे जेरबंद
दरम्यान, रात्रीच्या वेळी दुचाकीवरून जाणाऱ्या एका वृद्ध दाम्पत्याला चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील सोन्याचे दागिने लुटणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. अनिल अंबादास माळवे (वय ५३, रा. चौधरी कॉलनी, छत्रपती संभाजीनगर) आणि शाम उत्तम पवार (रा. वडीगोद्री, ता. अंबड, जि. जालना) अशी अटक झालेल्या आरोपींची नावे आहेत.