Akola Three People Died in Fire : अकोला जिल्ह्यात एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. काल संध्याकाळी घराला लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील तिघांचा होरपळून मृत्यू झाला आहे.
नेमकी घटना काय?
अकोल्याच्या अडगाव येथील आठवडी बाजाराजवळ शेख इब्राहिम यांच्या मालकीचं एक घर आहे. या घरात अनिल चव्हाण हे आपल्या कुटुंबासह भाडेकरू म्हणून वास्तव्यास होते. काल गुरुवारी संध्याकाळी 7 वाजेच्या सुमारास अचानक या घराला आग लागली. काही वेळातच आगीने संपूर्ण घराला कचाट्यात घेतलं. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, घरामध्ये मोठ्या प्रमाणात डिझेलचा साठा करून ठेवलेला होता. आगीचा संपर्क या डिझेलशी आल्याने काही क्षणातच स्फोट होऊन आगीच्या ज्वाळा घराबाहेर पडू लागल्या. यामुळे घरात अडकलेल्या नागरिकांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही. त्यामुळे त्यांचा आगीत होरपळून मृत्यू झाल्याची माहिती आहे.
Ajit Pawar: अजितदादांची जागा भरून काढणार, १५ वर्षांची परंपरा कायम ठेवणार; सुनेत्रा पवारांचा कार्यकर्त्यांसाठी खास निर्णय, पुण्यात…या भीषण आगीत तिघांचा मृत्यू झाला आहे, यामध्ये स्वरा प्रभुदास सोळंके (वय 6 वर्ष), अनिल उकर्डा चव्हाण (वय 27) आणि रत्ना उकर्डा चव्हाण (वय 55) असं मृतांची नावे आहेत. स्वरा आणि अनिल यांचा होरपळून मृत्यू झाला, तर रत्ना चव्हाण या गंभीररीत्या भाजल्या होत्या. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली. स्वरा सोळंके ही रत्ना चव्हाण यांच्या भावाची मुलगी होती तर अनिल चव्हाण हा स्वरा चव्हाण यांचा 27 मुलगा होता. आग लागल्याचे समजताच गावातील नागरिकांनी आग विझवण्यासाठी धाव घेतली. ग्रामपंचायतीने तात्काळ पाणीपुरवठा सुरू केला.
Solapur-Mumbai Vande Bharat : सोलापूर-मुंबई वंदे भारत सुसाट, प्रवाशांची एक्स्प्रेसला पसंती; वेळेची बचत आणि सुविधांबाबतही लोकप्रिय
अडगाव परिसरावर शोककळा
घटनेची माहिती मिळताच तेल्हारा आणि अकोट येथून अग्निशामक दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अथक परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं, मात्र तोपर्यंत तिघांचे प्राण गेले होते. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले. पोलीस विभागाच्या फॉरेन्सिक लॅबची (Forensic Lab) व्हॅन आणि पथकही रात्रीच अडगावात दाखल झाले असून, आगीचे नेमके कारण आणि डिझेल साठ्याबाबत अधिक तपास सुरू आहे. या घटनेमुळे संपूर्ण अडगाव परिसरावर शोककळा पसरली आहे.
