Pune Crime: बनावट शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली पुण्यातील एका वृद्धाची २२ कोटींची फसवणूक झाली. या प्रकरणात ठाण्यासह संभाजीनगरमधून चौघांना अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता, तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपींनी २७ नोव्हेंबर २०२५ ते नऊ जानेवारी २०२५ या कालावधीत शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीवर मोठा परतावा देण्याचे आमिष दाखवून ज्येष्ठ नागरिकाचा विश्वास संपादन केला. व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील करून लिंक डाउनलोड करण्यास सांगण्यात आले. त्या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली विविध सात बँक खात्यांमध्ये एकूण २२ कोटी रुपये जमा करण्यास भाग पाडले.
Solapur Crime: तीन मित्र दारू प्यायला बसले, एका गोष्टीवरून वादाला सुरुवात अन् नंतर थेट डोक्यात दगड घातला; सोलापुरात नेमकं काय घडलं?
लुबाडलेली रक्कम अनेक बँक खात्यांमध्ये वर्ग करण्यात आली होती. ही खाती मुनिलकुमार सुरेंद्र सिंह (वय ५१, अंबरनाथ, जि. ठाणे), आकाश चंद्रशेखर मराठे , लाला केशव उमाप (वय २६) आणि परमेश्वर दिलीप दाभाडे (वय २३, तिघेही रा. छत्रपती संभाजीनगर) यांच्या नावे होती. सायबर पोलिसांच्या दोन तपास पथकांनी ठाणे आणि छत्रपती संभाजीनगर येथून चौघांना ताब्यात घेतले. न्यायालयाने आरोपींना १२ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. ही कारवाई सायबर पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक स्वप्नाली शिंदे यांच्या पथकाने केली.
Chhatrapati Sambhajinagar: शिकतानाच सुट्टीत केटरिंगचं काम, लग्न सोहळ्याहून परतताना कारची धडक, विद्यार्थ्याचा करुण अंत
आयुष्याची पुंजी फसवणुकीत गमावली
फसवणूक झालेल्या ज्येष्ठ नागरिकाचा हडपसर परिसरात एक कारखाना होता. करोना काळानंतर त्यांनी कारखाना विक्री केला होता. त्यातून आलेले पैसे शेअर बाजारात गुंतवण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, सायबर चोरट्यांनी त्यांना जाळ्यात ओढून २२ कोटी रुपये गुंतवण्यास भाग पाडले होते. या प्रकरणी सायबर पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
