• Fri. Mar 6th, 2026

    अजित पवारांच्या विमान अपघातावर मंत्री छगन भुजबळांचं मोठं वक्तव्य

    अजित पवारांच्या विमान अपघातावर मंत्री छगन भुजबळांचं मोठं वक्तव्य
    नाशिक 
    गेल्या काही दिवसांपासून राज्याचे राजकारण शोकमग्न झाले आहे. त्या मागील मोठे कारण म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अपघाती निधन. 28 जानेवारी रोजी अजित दादांच्या विमानाला अपघात झाला होता. ते मुंबईवरुन सकाळी निघाले होते. त्यांना बारामतीमध्ये उतरायचे होते. पण नियतीला ते मान्य नव्हते. बारामतीमध्ये विमानाचे लँडिंग करताना विमानाला अपघात झाला आणि विमानातील सर्व प्रवासी एका क्षणात संपले. त्यामध्ये अजित पवारही होते. एकूण 6 प्रवासी त्या दुर्दैवी अपघातात निधन पावले.दरम्यान, आज नाशिक मध्ये स्वर्गीय अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते, मंत्री छगन भुजबळ आणि माजी खासदार समीर भुजबळ, पंकज भुजबळ यांनी स्वर्गीय अजित पवार यांच्या अस्थी नाशिकच्या कालिदास कला मंदिर या ठिकाणी आयोजित शोकसभेत आणल्या. शोकसभा संपल्यानंतर रामकुंड परिसरात या अस्थींचे विसर्जन करण्यात आले.

    या शोकसभेदरम्यान मंत्री छगन भुजबळ यांनी बोलताना पुन्हा एकदा माजी मंत्री स्वर्गीय अजित पवार यांचा झालेला विमान अपघात याबाबत शंका उपस्थित केली. देशात आणि राज्यात असे अनेक अपघात झाले मात्र अजित दादा यांचा झालेला हा अपघात अशा प्रकारचा अपघात, एवढ्या मोठ्या व्यक्ती बाबतचा अपघात पहिल्यांदाच मी अनुभवत असल्याचं त्यांनी यावेळी म्हटलं आहे.

    त्या नंतर बोलताना ते म्हटले की, “मी त्या ठिकाणचे काही सीसीटीव्ही देखील बघितले त्यामध्ये सरळ येत असलेलं विमान एकदम पलटी झाले, त्यामुळे कुठेतरी काहीतरी गडबड आहे,”असा संशय देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला. नाशिकमध्ये आयोजित शोक सभेदरम्यान बोलताना त्यांनी ही शंका उपस्थित केली.

    त्यानंतर ” या संपूर्ण प्रकरणाची चौकशी होईल काय ती माहिती देखील समोर येईल परंतु सोन्यासारखी माणसं गेली ती परत कशी काय येईल?”अशी खंत देखील यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी बोलताना केली.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *