Fisherman On Nitesh Rane: हा निर्णय शाश्वत मासेमारीच्या तत्त्वाला बाधा पोहोचवणारा असल्याचा आरोप महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीने केला आहे.
समितीच्या म्हणण्यानुसार, मासेमारी बंदीचा कालावधी ७५ दिवस करण्याबाबत शास्त्रज्ञ, सरकार आणि मच्छिमार समाजामध्ये एकमत झाले होते. त्यानुसार शासनाने आदेशही जारी केला होता. मात्र, बंदीचा कालावधी संपण्यापूर्वीच १२ नॉटिकल मैलांपुढील समुद्री क्षेत्रात मासेमारीस मुभा देण्याची घोषणा करण्यात आली. या निर्णयामुळे पारंपरिक आणि आर्थिक दुर्बल मच्छिमारांना नव्या हंगामासाठी आवश्यक तयारी करता आली नसल्याचा दावा समितीने केला आहे.
Vasai Crime : 32 कोटी लाटण्याचा डाव, कंपनीच्या अध्यक्षानेच एमडींचा काटा काढण्याचा प्लॅन आखला, वसईत थरारक घटना
राज्यातील सुमारे आठ हजार पारंपरिक मच्छिमार नौका १ ऑगस्टपासून सुरू झालेल्या हंगामाचा लाभ घेऊ शकणार नसल्याचा आरोपही करण्यात आला आहे. ‘या निर्णयाचा लाभ एलईडी पर्ससीन, हायस्पीड ट्रॉलर आदी मोठ्या भांडवली नौकांना होणार असून, पारंपरिक मच्छिमारांवर अन्याय झाला आहे,’ असा आरोप महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीने केला आहे. तसेच या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करून मंत्री नितेश राणे यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करावे, अशी मागणीही समितीने केली आहे.
Virar Crime : माझं बाळ द्या… सुनेनं लेकीला खेचलं, सासऱ्यांनी जोरात ढकललं, 28 वर्षांच्या प्राचीचा हृदयद्रावक अंत
महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे अध्यक्ष लिओ कोलासो, कार्याध्यक्ष रामकृष्ण तांडेल आणि सरचिटणीस किरण कोळी यांनी पत्रकार परिषदेत मंत्री नितेश राणे यांच्या भूमिकेचा निषेध व्यक्त केला.
Farmer News: शेतकऱ्यांना यूरियासोबत महागडी खते घेण्याची सक्ती? रोहित पवारांचा आरोप, कृषीमंत्र्यांनी केला खुलासा
दाभोसा धबधब्यावर रेलिंग तुटून दोघे दरीत
जव्हार तालुक्यातील प्रसिद्ध दाभोसा धबधबा येथे रविवारी दुपारी सुरक्षेसाठी उभारलेले लोखंडी रेलिंग तुटल्याने दोन पर्यटक दरीत कोसळले. वनविभागाचे कर्मचारी, स्थानिक नागरिक आणि उपस्थित पर्यटकांच्या तत्परतेमुळे दोघांचाही जीव वाचला. जखमी पर्यटकांवर उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची प्राथमिक माहिती जव्हार पोलिस ठाण्याकडून देण्यात आली. पावसाळ्यात दाभोसा धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी होत असते. रविवारीही मोठ्या संख्येने पर्यटक येथे आले होते. त्यावेळी दोन पर्यटक छायाचित्र काढण्यासाठी रेलिंगला टेकून उभे असताना, अचानक रेलिंग तुटल्याने ते दरीत कोसळले.
