Satpur Police Control Room Fake Call : ‘हॅलो… पोलिस नियंत्रण कक्ष? सातपूरमध्ये मर्डर झालाय, लवकर या!’ असा फोन पोलिस यंत्रणेच्या ‘डायल ११२’वर दोन महिन्यात दोन वेळा धडकला आहे
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. प्रतिनिधी, नाशिक : ‘हॅलो… पोलिस नियंत्रण कक्ष? सातपूरमध्ये मर्डर झालाय… रक्ताच्या थारोळ्यात एकजण पडलाय, लवकर या!’, असा फोन पोलिस यंत्रणेच्या ‘डायल ११२’वर धडकतो आणि सातपूर पोलिसांच्या हद्दीत तातडीने ‘अलर्ट’ जातो. पथके ‘सायरन’ वाजवून तातडीने धाव घेतात पण, तिथे कोणताही ‘क्राइम सीन’ नसतो. हा दोन महिन्यांत दुसऱ्यांदा घडलेला प्रकार असून, सातपूर हद्दीत ‘फेक मर्डर’चे कॉल करणाऱ्या दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
फेक कॉल प्रकरणी गुन्हा
सातपूर पोलिस ठाण्यातील अंमलदार नीलेश चव्हाण यांच्या फिर्यादीनुसार ‘फेक कॉल’ देणाऱ्या संशयिताविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम २१७ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. लोकसेवकाला त्रास देण्याच्या किंवा दुसऱ्या व्यक्तीचे नुकसान करण्याच्या उद्देशाने खोटी माहिती देणे हा ठपका त्याच्याविरुद्ध ठेवण्यात आला आहे. Disha Salian : आदित्य ठाकरेंवर FIR नोंदवून CBI तपास व्हावा, दिशा सालियानच्या वडिलांची विनंती, हायकोर्टाने मुंबई पोलिसांना खडसावलं
पोलिसांची वाहनं दुकानात धडकली
रविवारी (दि. २) दुपारी पावणेदोन वाजेच्या सुमारास ‘डायल ११२’वरून नियंत्रण कक्षात मिळालेल्या माहितीनुसार सातपूर पोलिस ठाण्यात फोन खणाणला. टाउन बीटमार्शलच्या ‘एमडीटी’वर खून झाल्याबाबतचा ‘कॉल फ्लॅश’ झाला. रस्त्यावरील वाहने बाजूला करीत थरारक चित्रपटाप्रमाणे पोलिसांची वाहने सातपूर एमआयडीसीतील ऑटोमोबाइलच्या दुकानात धडकली. आजूबाजूच्या नागरिकांची चौकशी सुरू झाली. मात्र, तिथे ना रक्ताचे डाग होते, ना कोणती गर्दी, ना कोणाची बॉडी!
पोलिसांनी परिसरातील काही व्यक्तींना विचारल्यानंतर ‘साहेब, येथे तर सगळे शांत आहे. कोणताही राडा झालेला नाही’, अशी माहिती दिली. पोलिसांनी ‘कॉल’ आलेल्या क्रमांकावर पुन्हा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रतिसाद मिळला नाही. त्यामुळे पोलिसांनी आक्रमक भूमिका घेत शासकीय यंत्रणेचा वेळ वाया घालवून पोलिसांची चेष्टा करणाऱ्या त्या संशयिताविरुद्ध गुन्हा नोंदवला. Tukaram Mundhe : तुकाराम मुंढे अडचणीत येण्याची शक्यता, FDA ला दंड लावावा लागेल, लायसन्स निलंबन मागे न घेतल्याने कोर्टाचा संताप
तीच बीटमार्शल असल्याने संशय
२४ मे रोजीही रविवार होता. सकाळी सव्वाअकरा वाजेच्या सुमारास ‘एमडीटी’वर खून झाल्याबाबतचा ‘कॉल’ प्राप्त झाला होता. त्या दिवशी अत्यंत महत्त्वाच्या बंदोबस्तात पोलिस व्यस्त होते. तातडीने पोलिसांनी धाव घेतली. मात्र, तेथे काहीच नव्हते. तेव्हाही एका मोबाइल क्रमांकधारकाविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला होता. यावेळी ‘बीटमार्शल’ तीच असल्याने तेथील तरुण किंवा विक्षिप्त, मद्यपींपैकी कोणीतरी खोडसाळपणा करीत असल्याचा पोलिसांना संशय आहे.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा