Gram Sevak abducted in Beed : बीडमध्ये एका ग्रामसेवकाला पत्नीने संगनमत करून व्यसनमुक्ती केंद्रात डांबल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आया कटातून भावांच्या मदतीने ग्रामसेवकाची सुटका झाली. नवऱ्याला तिने का कोंडलं होतं? संपूर्ण प्रकरण जाणून घ्या.
“पगार खाते संयुक्त करा, घर माझ्या नावावर करा”
पीडित व्यक्ती घरी न परतल्याने त्यांच्या भावांनी आणि नातेवाईकांनी शोधाशोध सुरू केली. सुरुवातीला पत्नीने ते प्रशिक्षणासाठी बाहेरगावी गेल्याचे सांगून सर्वांची दिशाभूल केली. मात्र, सत्य बाहेर आल्यावर पत्नीचे खरे रूप समोर आले. पगार खाते संयुक्त करा आणि घर माझ्या नावावर करा, तरच तुमची केंद्रातून सुटका होईल, अशी धक्कादायक अट तिने पतीसमोर ठेवली. यावरून हा सर्व प्रकार पूर्वनियोजित कट असल्याचे स्पष्ट होत आहे.
Beed Crime: खळबळजनक! बीडच्या जंगलात ‘महादेव ॲप’चा आंतरराष्ट्रीय अड्डा! मध्यरात्री पोलिसांचा छापा; कोट्यवधींची उलाढाल उघड
कायदेशीर हस्तक्षेप आणि सुटका
अखेर पीडिताच्या भावांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडे धाव घेतली. प्राधिकरणाच्या तत्पर हस्तक्षेपामुळे पीडित ग्रामसेवक व्यक्तीची त्या केंद्रातून सुटका झाली. सुटका करण्यापूर्वी संबंधित केंद्राने त्यांच्याकडून बळजबरीने १६,४०० रुपये फी म्हणून वसूल केल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या संपूर्ण प्रकारामुळे आपले शारीरिक, मानसिक आणि आर्थिक नुकसान झाले असून, केंद्राचे संचालक आणि पत्नीवर कठोर कारवाई करण्याची मागणी पीडिताने दिलेल्या लेखी तक्रारीत केली आहे.
Beed News : पत्नीचं आजारपण आणि कर्जाचा वाढता डोंगर; हतबल शेतकऱ्याने आयुष्य संपवलं, कुटुंबाचा आधार हरपला, गावात हळहळ
आरोप-प्रत्यारोप, चौकशीचा अहवाल
या प्रकरणावर सामाजिक कार्यकर्ते तत्वशील कांबळे यांनी संताप व्यक्त केला. विधी सेवा प्राधिकरणाने यावर अहवाल मागवला असल्याचे सांगितले. चौकशीअंती दोषींवर कडक कारवाई होणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. दुसरीकडे, व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक तेजस घुमरे यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. पत्नीने रीतसर शपथपत्र आणि पुरावे दिले होते, त्या आधारेच प्रवेश दिला होता. तक्रारीत काहीही तथ्य नाही, असा दावा त्यांनी केला आहे.या घटनेमुळे बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
