Konkan Kanya Express: कोकण रेल्वेच्या वेळापत्रकात काही बदल झाले आहे. मुंबईच्या दिशेने येताना काही एक्सप्रेसच्या वेळा बदलल्या गेल्या आहेत. कोणत्या एक्सप्रेसचा समावेश आणि कशामुळे वेळापत्रक बदलले?
वेळापत्रक का बदलणार?
पनवेल-कळंबोली रेल्वे स्थानकांदरम्यान ओपन वेब गर्डरची उभारणी करण्यात येणार असून, हे काम डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर (DDFC) अर्थात समर्पित मालवाहतूक मार्ग प्रकल्पाचा भाग आहे. या कामासाठी रात्रकालीन ब्लॉक घेण्यात आला असून, हा ब्लॉक 18 जानेवारी ते 15 फेब्रुवारी दरम्यान लागू राहणार आहे. रात्रकालीन ब्लॉकमुळे नियमित लोकल सेवांवर फारसा परिणाम होणार नसला, तरी 16 मेल-एक्सप्रेस गाड्या विलंबाने धावणार आहेत. यामध्ये कोकण रेल्वेच्या गाड्यांचाही समावेश आहे.
Mumbai AC Local: चर्चगेट-विरार मार्गावर सर्वसामान्य प्रवाशांचे होणार हाल; 26 जानेवारीपासून एसी लोकल वाढणार, त्यामुळे साधारण लोकल…
कोणत्या एक्सप्रेसवर परिणाम?
या कालावधीत एकूण सहा वेळा ब्लॉक घेतला जाणार असून, कोकणातून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या प्रवाशांना मोठा फटका बसणार आहे. 18 जानेवारी रोजी ब्लॉकदरम्यान दौंड–ग्वाल्हेर एक्सप्रेस पनवेलऐवजी कर्जत–कल्याण–वसई मार्गे वळवण्यात येणार आहे. तर मंगळुरू-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस काही काळासाठी थांबवण्यात येणार असल्याने प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता आहे.
Mumbai Local Train: मध्य रेल्वेवर महिनाभर मोठा ब्लॉक, लोकलसह एक्सप्रेस विलंबाने; पनवेल, कर्जत, कल्याण… कुठे होणार परिणाम?
याशिवाय कोकणातून मुंबईत येणार्या एक्सप्रेसही या ब्लॉकदरम्यान थांबण्यात येणार आहेत. मुंबईकडे येणारी कोकणकन्या, तुतारी आणि मत्स्यगंधा एक्सप्रेस ठिकठिकाणी थांबवण्यात येणार असल्यामुळे वेळापत्रक बदलणार आहे. त्यामुळे रेल्वेचं वेळापत्रक बदलणार आहे. CSMTवरून 7.10 ला सुटणारी मांडवी एकस्प्रेस या ब्लॉमुळे 8.20 ला सुटेल, तसेच, मडगावलासुद्धा ही एक तास उशीरा पोहचेल.
Mumbra Train accident : गर्दी कमी करण्यासाठी टास्क फोर्स, सरकारचं नवं पाऊल
ब्लॉकचे नियोजित दिवस
18 जानेवारी ते 15 फेब्रुवारी दरम्यान, 18 जानेवारी, 25 जानेवारी, 3 फेब्रुवारी, 12 आणि मग 14 फेब्रुवारी असे सहा दिवस ब्लॉक जाहीर केला गेला आहे. या पार्श्वभूमीवर कोकणवासीयांनी प्रवास करण्यापूर्वी अद्ययावत वेळापत्रक तपासूनच निघावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
