• Sun. Jun 14th, 2026

    Mumbai Water Cut: मुंबईत 44 तास पाणी कपात, मेट्रोच्या कामांमुळे पुरवठा बंद; भांडूप, विक्रोळी… कुठे होणार परिणाम?

    Mumbai Water Cut: मुंबईत 44 तास पाणी कपात, मेट्रोच्या कामांमुळे पुरवठा बंद; भांडूप, विक्रोळी… कुठे होणार परिणाम?

    Mumbai News: माघी गणपतीच्या काळातच मुंबईकरांवर पाणी कपातीचं संकट येणार आहे. तब्बल 44 तास पाणी पुरवठा बंद केला जाणार आहे. कधी आणि कुठे होणार परिणाम हे जाणून घ्या

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    मुंबई: मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. मुंबई मेट्रो 7 च्या कामांमुळे शहरातील अनेक भागांत तब्बल 44 तास पाणी कपात केली जाणार आहे. विशेष म्हणजे ही कपात माघी गणेशोत्सवाच्या आठवड्यात होणार असल्याने नागरिकांची गैरसोय होण्याची शक्यता आहे.

    बीएमसीकडून MMRDAच्या मेट्रो 7 मार्गिकेसाठी भुयारी जलवाहिनी वळवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे 20 जानेवारी सकाळी 9 वाजल्यापासून 22 जानेवारी गुरुवारी पहाटे 5 वाजेपर्यंत पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे. बीएमसीच्या माहितीनुसार, या कालावधीत काही भागांत पूर्ण पाणीपुरवठा बंद, तर काही ठिकाणी कमी दाबाने पाणी किंवा वेळेत बदल करण्यात येणार आहे. कोणत्या प्रभागांवर परिणाम होणार आहे, हे जाणून घ्या.

    Maharashtra TimesMumbai News: मेट्रो स्थानकांपासून थेट घरापर्यंत बस, अवघ्या 9 रुपयांत होणार वातानुकूलित, आरामदायी प्रवास; कधी-कुठे?

    कोणत्या भागांवर परिणाम

    जी उत्तर प्रभाग: धारावी, माहीमचा काही भाग आणि माटुंगा लेबर कॅम्प परिसरात 20 व 21 जानेवारी रोजी सकाळ व संध्याकाळच्या वेळेत कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.
    के पूर्व प्रभाग (सर्वाधिक फटका): अंधेरी पूर्वमधील एमआयडीसी मरोळ, चाकाला, सहार, विमानतळ परिसर, सीप्झ, कोंडिविता, माहेश्वरी नगर, बामनवाडा, पारसी वाडा आणि सहार गाव या भागांत पूर्ण पाणीपुरवठा बंद राहणार आहे. काही ठिकाणी मर्यादित वेळेसाठी कमी दाबाने पाणी मिळेल.
    एस वॉर्ड: भांडुप पश्चिम व विक्रोळी पश्चिममधील मोरारजी नगर, जय भीम नगर, कैलाश नगर, बेस्ट नगर, फिल्टरपाडा आणि आरे रोड परिसरात कमी दाबाने किंवा पूर्णपणे पाणीपुरवठा बंद राहण्याची शक्यता आहे.
    एच पूर्व वॉर्ड: वांद्रे पूर्व आणि संपूर्ण वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) परिसरात रात्री उशिरा कमी दाबाने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.
    एन वॉर्ड: विक्रोळी पश्चिम रेल्वे स्टेशन रोड, गोदरेज कंपाऊंड, आर सिटी मॉल परिसर, कैलाश कॉम्प्लेक्स, श्रेयस सिनेमा परिसर तसेच वाधवा रेसिडेन्सी व प्रेसिडेंशियल टॉवर्स या निवासी संकुलांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे.

    Maharashtra TimesAtal Setu: मुंबई-नवी मुंबई प्रवास होणार टेन्शन फ्री, अटल सेतूवर टोलवर 50% सूट; ‘या’ वाहनांसाठी पूर्णपणे टोलमुक्त प्रवास

    बीएमसीने नागरिकांना पाण्याचा साठा करून ठेवण्याचे आणि पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन केले आहे. दुरुस्तीच्या काळात पाण्याचा जपून वापर करण्याचे आणि खबरदारी म्हणून पुढील काही दिवस पिण्याचे पाणी उकळून व गाळून वापरण्याचे आवाहन केले आहे. आवश्यक पायाभूत सुविधांची कामे सुरू असताना नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही पालिकेने केले आहे.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम, मटा ऑनलाईनमध्ये कन्सल्टंट पदावर कार्यरत आहे. प्रामुख्याने क्राइम, सिव्हिक आणि पॉलिटिक्स या बातम्या कव्हर करते. याआधी सहा महिने महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमध्ये कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून काम केले आहे. त्या काळात कॉलेज इव्हेंट्स, शैक्षणिक उपक्रम आणि सोशल मीडियावरील ट्रेंड्सवर बातम्या केल्या. मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून BMM मध्ये पदवी घेतल्यानंतर सध्या के.सी. महाविद्यालयात MA in Communication and Journalism करत आहे. इंटरनॅशनल घडामोडी आणि पॉप कल्चर हे विषय विशेष आवडीचे असून इंग्लिश आणि मराठी या दोन्ही भाषेत वाचन व लेखन करण्याची आवड आहे.… आणखी वाचा