राज्यातील २९ महापालिकांसाठी आज मतदान होत आहे. मतदारांच्या बोटांवर लावलेली शाई सहज निघत असल्याने दुबार मतदानाचा धोका वाढला आहे.या प्रकरणी पोलीस आणि निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात येणार आहे.
पुण्याच्या धायरी परिसरात मतदान केंद्राबाहेर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एका तरुणाला रंगेहात पकडलं. हा तरुण भाजपचा कार्यकर्ता असल्याचा दावा त्यांनी केला. मतदान केंद्राच्या बाहेर हा तरुण केमिकलची बाटली घेऊन बोटावरील शाई पुसत होता. एका महिलेच्या बोटावरील शाई पुसताना राष्ट्रवादी काँग्रेस शपच्या पदाधिकाऱ्यांनी त्याला पकडलं. त्याला चांगलाच चोप दिला. यामुळे काही वेळ वातावरण तापलं. मतददान केंद्राच्या बाहेरच शाई पुसली जात असल्यानं मोठा गोंधळ उडाला.
Maharashtra Municipal Election: काढा ते आधी! प्रचार करताय का इथे? भाजपच्या पोलिंग एजंटमुळे वाद; राज ठाकरेंचा शिलेदार एकटा भिडला
शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यानं केमिकलचा वापर करुन मतदानानंतरची बोटावरील शाई पुसणाऱ्या तरुणाचा व्हिडीओच दाखवला. बोटावर असलेली शाई अगदी उघडपणे पुसली जात आहे. जो तरुण हा उद्योग करत होता, त्याला आम्ही रंगेहात पकडलं. तेव्हा काही जण त्याला सोडवायला आले. हा आमचा माणूस असल्याचा दावा त्यांनी केला. तरुणाच्या डोक्यावर भाजपची टोपी होती. वाचवायला आलेले लोकही भाजपचे होते, असा दावा राष्ट्रवादी शपच्या कार्यकर्त्यानं केला.
मतदानानंतर बोटावर शाई लावण्यात आहे. त्या शाई लावण्याचा हेतू काय, असा प्रश्न राष्ट्रवादी शपच्या कार्यकर्त्यानं विचारला. ‘दुबार मतदान रोखण्यासाठी बोटावर शाई लावली जाते ना? मग ती शाई पुसण्याचं कारण काय? केमिकल कशासाठी वापरायचं?’, अशी प्रश्नांची सरबत्तीच शरद पवारांच्या कार्यकर्त्यानं केली. या प्रकरणी पोलीस आणि निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आल्याचं त्यानं सांगितलं.
