• Wed. Sep 16th, 2026

Vishwas Nangare Patil: विश्वास नांगरे पाटलांच्या पथकाचा दणका; चकवा देण्यासाठी आरोपीने देवघराखाली खड्डा खणला, धाड टाकताच बिंग फुटलं

नागपूर : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अवैध दारूविक्री आणि प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीविरोधात पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या एस्कॉर्ट पथकाने कारवाईचा धडाका सुरू केला आहे. एपीआय भगवान कोळी यांच्या नेतृत्वाखालील एस्कॉर्ट पथकाने वाडी परिसरात केलेल्या कारवाईत हद्दपार आरोपीच्या घरातील देवघराखाली लपवून ठेवलेला देशी दारूसाठा उघडकीस आणला. आरोपीने पोलिसांची नजर चुकवण्यासाठी देवघराच्या खाली चक्क खड्डा खोदून त्यात दारूच्या बाटल्या लपवून ठेवल्या होत्या. या कारवाईत देशी दारू आणि विक्रीची रोकड असा सुमारे सात हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

एस्कॉर्ट पथक नागपूर शहरात गस्त घालत असताना वाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सोनबा नगर, खडका रोड परिसरात महादेव ऊर्फ मोगली लिंगाजी कन्नूर हा अवैधरीत्या देशी दारूची विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच पथकाने तातडीने कारवाईची तयारी केली. पंचांना सोबत घेऊन पोलिसांनी कन्नूर याच्या घराची झडती घेतली. घरातील विविध ठिकाणांची तपासणी सुरू असताना पोलिसांचे लक्ष गणरायाची स्थापना केलेल्या देवघराकडे गेले. देवघराखाली संशयास्पद जागा असल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी तपासणी केली. त्यावेळी देवघराच्या खाली गड्डा खोदून त्यात देशी दारूच्या बाटल्या लपवून ठेवल्याचे आढळून आले. पोलिसांनी हा दारूसाठा बाहेर काढत विक्रीतून मिळालेली रोकडही जप्त केली.

विशेष म्हणजे महादेव ऊर्फ मोगली कन्नूर याला गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिस उपायुक्त, परिमंडळ-१ यांच्या आदेशाने तात्पुरते हद्दपार करण्यात आले होते. हद्दपारीचा आदेश असतानाही तो शहरातच आढळून आला आणि त्यातच तो अवैध देशी दारूची विक्री करत असल्याचे कारवाईत समोर आले. पोलिसांची नजर चुकविण्यासाठी त्याने घरातील देवघराखाली गड्डा खोदून दारू लपविण्याची शक्कल लढवली होती.

पान सेंटरवरही छापा

दरम्यान, एस्कॉर्ट पथकाने सक्करदरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतही कारवाई केली. मोठा ताजबाग परिसरातील ‘केजीएन’ पान सेंटरवर रात्री सुमारे तीन वाजता पोलिसांनी छापा टाकून तपासणी केली. या कारवाईत प्रतिबंधित गुटखा, तंबाखूजन्य हुक्का फ्लेवर आणि खर्रा असा सुमारे आठ हजार रुपयांचा मुद्देमाल आढळून आला. पोलिसांनी प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त केला असून, पान सेंटरचा संचालक शेख शफी मोहम्मद मालाधारी (५८) याच्याविरुद्ध संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.

गणेशोत्सवाच्या काळात शहरातील अवैध व्यवसाय, अवैध दारूविक्री तसेच प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांकडून गस्त आणि तपासणी वाढविण्यात आली आहे. पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या निर्देशानुसार एस्कॉर्ट पथकाकडून सुरू असलेल्या या कारवायांमध्ये दोन स्वतंत्र प्रकरणांत एकूण १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून अशा कारवाई सुरू राहणार असल्याचेही पोलिसांनी सांगितले आहे.

लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा

Sanjeev Sonawane : संजीव सोनवणे प्रकरण; घराचं गेट उघडताच भावाला आवाज, बहिणीमुळे घटनेचा उलगडा, संपूर्ण कुटुंब विदेशात; नैराश्य असल्याचीही चर्चा
Nashik Accident : पहिल्यांदाच गणपती बसवण्याचा उत्साह, पण आनंदावर विरजण, बाप्पाच्या आगमनावेळी कृष्णाचा अपघाती मृत्यू; जिवाभावाचा मित्र गेल्यानं सर्वच ढसाढसा रडले
मोदींनी मैत्री निभावली, जुन्या सोबत्याची तक्रार येताच सूत्रं हलवली, महाराष्ट्रातील भाजप आमदाराची माघार, शिंदेंच्या डिपार्टमेंटला पत्र

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed