• Wed. Sep 16th, 2026

Nashik Accident News : नाशिकमध्ये ऐन गणेशोत्सवात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पहिल्यांदाच गणपती बाप्पा बसवायचा आनंद संपूर्ण मित्रमंडळात होता. पण कृष्णाच्या अपघातीन निधनाने संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे.

नाशिक वडनेर दुमाला कृष्णा अपघात मृत्यू(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म. टा. प्रतिनिधी, नाशिक : ज्या घरादारांत आणि गल्लीबोळांत बाप्पाच्या आगमनाची उत्सुकता शिगेला पोहोचली होती, जिथे ढोल-ताशांच्या गजरात आणि ‘मोरया’च्या जयघोषात लाडक्या गणरायाचे स्वागत करण्याची तयारी पूर्ण झाली होती, तिथेच एका क्षणात शांतता पसरली. गणेशमूर्ती आणण्यासाठी रात्रीच्या अंधारात निघालेला २३ वर्षीय कृष्णा ज्ञानेश्वर बेरड याचा अपघाती मृत्यू झाल्याने वडनेर दुमाला परिसरावर शोककळा पसरली आहे. उत्सवाच्या आनंदात रंगलेले वातावरण क्षणात दुःखात बदलले आहे.

नेमकी घटना काय?

वडनेर येथील ‘मोरया फाउंडेशन’च्या माध्यमातून गावातील तरुण यंदा प्रथमच मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याच्या तयारीत होते. बाप्पाचे आगमन दिमाखात व्हावे, यासाठी कृष्णा आणि त्याचे मित्र गेल्या काही दिवसांपासून अथक मेहनत घेत होते. सोमवारी (दि. १४) रात्री उशिरा पाथर्डी फाट्यावरील काम आटोपून कृष्णा मित्रासह आडगाव नाक्याकडे गणेशमूर्ती आणण्यासाठी निघाला होता. मात्र, छत्रपती संभाजी नाका परिसरातील उड्डाणपुलाजवळ त्याच्या दुचाकीचा अपघात झाला.

Maharashtra TimesMaharashtra Weather : वरुणराजा रुसला! पावसाळा संपण्यासाठी अवघे दोन आठवडे, मेघराजा बरसण्याची शक्यता नाहीच, IMDचा नवीन अंदाज; कुठे काय परिस्थिती?

मित्रपरिवाराला जबर धक्का

अपघातात कृष्णा रस्त्यावर फेकला गेला आणि त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर त्याला तातडीने उपचारांसाठी अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, पहाटेच्या सुमारास डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. बाप्पाची मूर्ती आणण्यासाठी निघालेल्या कृष्णाच्या अशा अकस्मात मृत्यूने त्याच्या मित्रपरिवाराला जबर धक्का बसला आहे. ज्या हातांनी लाडक्या विघ्नहर्त्याची मूर्ती आणायची होती, तेच हात काळाने कायमचे हिरावून घेतल्याची भावना व्यक्त होत आहे.

जिवाभावाचा मित्र गेल्यानं हळहळ

जिवाभावाचा मित्र गमावल्याने ‘मोरया फाउंडेशन’ने यंदाचा सार्वजनिक गणेशोत्सव रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. आनंदोत्सवाऐवजी कृष्णाच्या आठवणी आणि त्याच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त करण्याचा निर्णय कार्यकर्त्यांनी घेतला. कृष्णाच्या आई-वडील, बहीण आणि नातेवाइकांचा आक्रोश उपस्थितांचे काळीज पिळवटून टाकणारा होता. बाप्पाच्या आगमनाने उजळून निघणाऱ्या गावात आता आनंदाऐवजी स्तब्धता, अश्रू आणि हळहळ उरली आहे.

Maharashtra TimesSunetra Pawar : आपल्या वहिनी आहेत ना… प्लॅन ठरला! सुनेत्रा पवारांचं राजकीय रिलाँचिंग; तटकरे-पटेलांबाबत मात्र संदिग्ध भूमिका

पोटच्या गोळ्यानं माऊलीला संपवलं

नशेच्या धुंदीत पत्नीशी किरकोळ कारणावरून भांडण करणाऱ्या मुलाने मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या वृद्ध आईच्या डोक्यात टणक वस्तूने वार करून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ‘जेवणात पिठलं का नाही बनवलं’ या कारणावरून हा वाद सुरू झाल्याची माहिती समोर आली आहे. हनुमान नगरात घडलेल्या खुनाच्या घटनेत संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून, गंगापूर पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा