• Wed. Jun 17th, 2026

    Public Holiday: 15 जानेवारीला राज्यात सार्वजनिक सुट्टी; मात्र मतदानासाठी ‘या’ कर्मचाऱ्यांना भरपगारी रजा नाही; सुट्टीऐवजी…

    Public Holiday: 15 जानेवारीला राज्यात सार्वजनिक सुट्टी; मात्र मतदानासाठी ‘या’ कर्मचाऱ्यांना भरपगारी रजा नाही; सुट्टीऐवजी…

    म.टा. खास प्रतिनिधी, मुंबई: राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी १५ जानेवारी रोजी सार्वत्रिक निवडणूक होत आहे. या निवडणुकीमध्ये मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी उद्योग, आस्थापना व कारखान्यांमधील कामगार, कर्मचाऱ्यांना या दिवशी सुट्टी किंवा सवलत देणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसे परिपत्रक उद्योग, उर्जा, कामगार व खनिकर्म विभागाने जारी केला आहे.

    महानगरपालिका क्षेत्रातील केंद्र सरकारची कार्यालये, निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम, बँका, शैक्षणिक तत्सम आस्थापनांनाही सार्वजनिक सुट्टी लागू राहील, असे सामान्य प्रशासन विभागाच्या अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे. या शासन निर्णयानुसार, निवडणूक क्षेत्रात तसेच क्षेत्राबाहेर कार्यरत असलेल्या सर्व कामगार, अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतदानासाठी सुट्टी देण्यात यावी, असे आदेश आस्थापनांना देण्यात आले आहेत. उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने, हॉटेल, निवासस्थाने, आयटी कंपन्या, मॉल, शॉपिंग सेंटर, किरकोळ विक्रेते आदींना हे आदेश लागू राहणार आहेत.

    BMC Election: आजपासून मुंबईत मोठी वाहतूक बंदी; सायन, मालाड… अनेक मार्गांवरील वाहने वळवली, घराबाहेर पडण्यापूर्वी पर्यायी मार्ग पाहा

    अपवादात्मक परिस्थितीत पूर्ण दिवसाची सुट्टी देणे शक्य नसल्यास किमान तीन तासांची विशेष सशुल्क सवलत देणे बंधनकारक करण्यात आले आहे. या आदेशांचे पालन न केल्यास संबंधित आस्थापना मालकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे शासन निर्णयात सूचित करण्यात आले आहे.

    दुबार मतदारांना ओळखा आणि तिथेच फोडा; अमित ठाकरेंचा आक्रमक अंदाज

    उमेदवारांची माहिती एका क्लिकवर

    एकीकडे ५०० ते १००० रुपयांच्या रोजंदारीवर विविध राजकीय पक्षांच्या प्रचारफेऱ्यांमध्ये सहभागी होणाऱ्या महाविद्यालयीन तरुणांची चलती असताना दुसऱ्या बाजूला कांदिवलीच्या एका अभियांत्रिकी महाविद्यालयातील तरुणांनी एकत्र येत एक अनोखे संकेतस्थळ सुरू केले आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणातील उमेदवारांचे शिक्षण, त्यांच्याविरोधात असलेले गुन्हे आणि त्यांनी दिलेली आश्वासने, यांची माहिती सर्वांना एका क्लिकवर मिळावी, या उद्देशाने या तरुणांनी www.mumbaitracker.in हे संकेतस्थळ तयार केले आहे. त्यासाठी या सर्वांनी उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्रांसह त्यांच्या पक्षांच्या जाहीरनाम्यांचाही अभ्यास केला आहे. कांदिवलीच्या ठाकूर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये कम्प्युटर सायन्सच्या शेवटच्या वर्षाला शिकणाऱ्या अंश शेट्टी या २१ वर्षीय तरुणाला त्याच्याच प्रभागात असलेल्या उमेदवारांच्या शैक्षणिक पार्श्वभूमीची माहिती हवी होती.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम, मटा ऑनलाईनमध्ये कन्सल्टंट पदावर कार्यरत आहे. प्रामुख्याने क्राइम, सिव्हिक आणि पॉलिटिक्स या बातम्या कव्हर करते. याआधी सहा महिने महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमध्ये कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून काम केले आहे. त्या काळात कॉलेज इव्हेंट्स, शैक्षणिक उपक्रम आणि सोशल मीडियावरील ट्रेंड्सवर बातम्या केल्या. मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून BMM मध्ये पदवी घेतल्यानंतर सध्या के.सी. महाविद्यालयात MA in Communication and Journalism करत आहे. इंटरनॅशनल घडामोडी आणि पॉप कल्चर हे विषय विशेष आवडीचे असून इंग्लिश आणि मराठी या दोन्ही भाषेत वाचन व लेखन करण्याची आवड आहे.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed